Maharashtra: ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा नियोजन बैठकीचे आयोजन.

0
28

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती मार्फत दरवर्षी ५ व ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी या सोहळ्याला ३५० वे वर्ष सुरू होत आहे. या वर्षीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करणेचे नियोजन सुरु आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-जैतिर-उत्सवाला-फुलला-भ-2/

दरवर्षी लाखो शिवभक्त गडावर उपस्थित रहात असतात. शाहिरी कार्यक्रम , शिवराज्याभिषेक सोहळा, पालखी सोहळा, शिरकाई देवीला जागरण-गोंधळ असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणेत आला आहेत. या सोहळ्यात शिवभक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणेत आली असून लाखो शिवभक्तांसाठी हा सोहळा पूर्ण होईपर्यंत अन्नछत्र सुरू राहणार आहे. या वर्षी सोहळा मोठ्या प्रमाणात होत असून दि. ६ जून २०२४ पर्यंत वर्षभर विविध कार्यक्रम घेणेत येणार आहेत.

या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याची सविस्तर माहिती देणेसाठी रविवार दि.२१ मे रोजी सायंकाळी ठिक ०५.०० वाजता ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, शिवाजीनगर, पुणे
येथे सर्व शिवभक्तांची नियोजन बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत श्रीमंत युवराज संभाजी छत्रपती महाराज हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन ज्यांचे मार्गदर्शनाखाली होते, त्या युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती  उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व शिवभक्त, इतिहास प्रेमींनी या नियोजन बैठकीला  उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, दुर्गराज रायगड यांचेमार्फत करणेत येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here