
हरिद्वार: महिंद्रा अँड महिंद्राचा विभाग असलेल्या महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी (LMM) ने हरिद्वार येथील कारखान्यातून त्यांची ५०००० वी ई-अल्फा बाहेर आणली आहे. एलएमएम तर्फे ई-अल्फा मिनी ई-रिक्षा तसेच ई-अल्फा कार्गो यांची विक्री होते. लाल ई-अल्फा मिनी हे महत्वाचे वाहन आहे. ई-अल्फा मिनी ही महिंद्राच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक ३ – व्हीलर पैकी एक आहे. २०१७ मध्ये ती सादर करण्यात आली. महिंद्राने २०२१ मध्ये कार्गो आवृत्ती सादर केली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-टॉर्क-मोटर्स-पुणे-डीलरश/

महिंद्रा ई-अल्फा मध्ये लीड अॅसिड बॅटरी पॅकच्या जोडीला एक मजबूत फुल मेटल बॉडी कन्स्ट्रक्शन आहे. दोन्ही ई-ल्फास १.५ किलोवॅट पीक पॉवर तयार करतात, तर सुधारित कामगिरीसाठी कार्गो प्रकार पर्यायी उच्च टॉर्क गियरसह सुसज्ज आहे. दोन्ही वाहनांची रिअल-वर्ल्ड रेंज ८० किमी/चार्ज आहे. १० लाख रुपयांचा ड्रायव्हर अपघाती विमा, २४x ७ रस्त्यावर सहाय्य आणि डाउनटाइम हमी देणारी महिंद्रा ही एकमेव ओईएम आहे. २ वर्षांची सर्वोत्कृष्ट वाहन वॉरंटी (१ वर्ष नियमीत + १ वर्ष विस्तारित) या इलेक्ट्रिक ३ – व्हीलरला एक आकर्षक प्रस्ताव बनवते.
हा महत्त्वपूर्ण प्रसंग साजरा करण्यासाठी महिंद्रा डीलर्स ग्राहकांना आकर्षक ७५००.०० रुपयांच्या एक्सचेंज बोनस योजनेसह उत्कृष्ट ई-अल्फा मिनीमध्ये अपग्रेड करण्यात मदत करत आहेत. विकल्या गेलेल्या प्रत्येक ई-अल्फा मिनी सोबत, ग्राहकांना खात्रीशीर भेटवस्तू देखील मिळते. दोन्ही ऑफर स्टॉक शिल्लक असेपर्यंत लागू आहेत.
महिंद्रा एलएमएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा म्हणाले, “ई-रिक्षाच्या विभागात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे आणि आम्ही ५०००० ई-अल्फास सादर केल्या आहेत हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. मिळकतीची अफाट क्षमता, महिंद्रावरील विश्वास आणि आमची मजबूत विश्वासार्हता यातून आमच्या ईव्हीज ग्राहकांसाठी एक पसंतीचा शाश्वत पर्याय बनत आहेत. राज्य नियमांच्या अधीन राहत महिंद्रा ई-अल्फा वाहने संपूर्ण भारतात उपलब्ध आहेत.

