इंदापूर/🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार
मागील अनेक दिवसांपासून इंदापूर विधानसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आला असून आता अखेर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. शुक्रवारी इंदापूर मध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याची घोषणा करत मी व माझे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत आहोत अशी घोषणाही त्यांनी केली.https://sindhudurgsamachar.in/kokan-छत्रपती-शिवाजी-महाराजां/
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत नेमका काय घडलं याची माहितीही हर्षवर्धन पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची आपण शरद पवार यांच्या अगोदर भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर ऐवजी दुसऱ्या जागेवरून निवडणूक लढवा असा पर्याय सांगितला. मात्र मला तो मान्य नव्हता आणि मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, त्यामुळे आपण शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत आहोत असे सांगितले.