🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कोल्हापूर l प्रतिनिधी- प्रमोद सूर्यवंशी
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभानिवडणुकीत महायुती आघाडीने भरघोस बहुमत प्राप्त करून सत्तेत प्रवेश केला. त्यासाठी राबविण्यात आलेली लाडकी बहिण योजना कमालीची लोकप्रिय आणि यशस्वी ठरली. बहिणींना अचानक धनलाभ होवून त्याचा परिणाम महायुतीला मतलाभ होण्यात झाला. जरी हे खरे असले तरी राज्याच्या तिजोरीवर त्याचा अनावश्यक भार पडून अनेक विकासकामांना निधी कमी पडण्यात होणार आहे. तशी भावना सध्या सर्वसामान्य लोकांतून मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-काॅंक्रिटच्या-जंगलात-ति/
या योजनेमुळे अनेक लाडक्या बहिणी आळशी बनत असून काही दाजीबा पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. वर्षे४३ एकीकडे लाडक्या बहिणी तुपाशी खात असताना दुसरीकडे अपंग भाऊ मात्र उपाशी राहत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा लोकांना शासनाकडून अतिशय तुटपुंजे मानधन देवून त्यांची अक्षरश: बोळवण करण्यात येत आहे. अगदी उदाहरणच दयायचे झाले तर संध्यामठ कोल्हापूर येथील श्री. युवराज सुतार वय यांचे देता येईल. त्याचे दोन्ही हात जन्मापासून अधू असल्यामुळे त्यासा कोणतेही काम करता येत नाही. त्यातच चरितार्थासाठीच कोणते भक्कम असे साधन सध्या त्याच्याकडे नाही. अशा व्यक्तीस केवळ मासिक ९५०० रुपये शासनाकडून दिले जात आहेत. इतक्या कमी पैशात त्याचा चरितार्थ कसा काय चालू शकतो ? याचे कोडे शासनास पडत नाही. का? इतके कमी पैसे देवून शासन त्याची क्रूर चेष्टा करीत नाही ना? बनत असून काही दाजीबा पूर्णपणे व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत.
युवराजसार अनेक अपंग व्यक्तींना शासनाकडून अतिशय तुटपुंजी मदत मिळत आहे. या मदतीमुळे तो या महागाईच्या जमान्यात घड जगूही शकत नाही अन् त्याला परमरुही दिले जात नाही जिथे मदतीची खरोखरच गरज आहे तिथे शासनाची उदासिनता दिसते आणि जिथे मदतीची फारशी तिथे वारेमाप उधळपट्टी केली जात आहे. सरकारी तिजोरीत अगोदरच खडखडाट असताना लाडकी बहिण योजनेची अंमल- बजावणी खरेच गरजेची आहे का? असा इन सवाल आता जनतेतूनच विचारला जात आहे.