Maharashtra: अनिल देशमुखांना मोठा दिलासा; तुरुंगाबाहेर येणार

2
282
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून गुन्हा दाखल
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून गुन्हा दाखल

मुबंई- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत.
देशमुख यांच्या सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. देशमुख यांच्या जामीनाला स्थिगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.