मुबंई- देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्षपणे तसेच अप्रत्यक्षपणे शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी कायमच केंद्र तसेच राज्य सरकारकडून वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित केल्या जातात. अशातच केंद्राद्वारे ड्रोन खरेदीसाठी देखील एक योजना चालवली जात आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-शिक्षक-पात्/
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंतचे ड्रोन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांना जवळपास अडीच लाखांपर्यंतच अनुदान उपलब्ध होत आहे.विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील कोकण विभागासाठी रत्नागिरी या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.