श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. या सोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. नागपंचमीची तिथी, महत्व, पूजाविधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-नागपंचमीला-उघड/
महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्या- साठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. नागपंचमीचा मुहूर्त, पूजाविधी, महत्त्व आणि मान्यता यांविषयी थोडक्यात…
नागपंचमी मुहूर्त
नागपंचमी २१ ऑगस्ट २०२३ सोमवार रोजी असून, शुक्ल पक्षाची पंचमी तिथी रात्री १२.२३ पासून सुरू होईल आणि २१ तारखेच्या मध्यरात्री २.१५ पर्यंत राहील.
नागपंचमीचे महत्व
श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. नागपंचमी दिनी अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची पूजा केली जाते. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते.
नागपंचमी पूजाविधी
या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा करावी. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करावी. पूजेवेळी ‘नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!’ ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! हा मंत्रोच्चार करावा.नागपूजेच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो अशीही मान्यता आहे.
नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यास कुटुंबात सर्पभय राहत नाही, असे भविष्य पुराणात सांगितले गेले आहे. सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गायीच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दूर्वा आणि शेंदूर लावावे. या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये. हिंसा करू नये, जमीन खणू नये. दिंड, पातोळया, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत, असे अनेक संकेत आहेत. त्या संबंधीच्या विविध कथाही सर्वश्रुत आहे