Maharashtra: आरपीआयचे शिर्डीमध्ये राज्यव्यापी अधिवेशन, मुख्यमंत्री शिंदेसह, फडणवीस उपस्थित राहणार

0
14
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत — आगामी निवडणुकांवर होणार चर्चा

शिर्डी :रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य महाअधिवेशन शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे राज्यव्यापी अधिवेशन (Statewide convention) येत्या 28 मे रोजी शिर्डी (Shirdi) येथे आयोजित करण्यात आले असून राज्यव्यापी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुंबईतील कार्यकर्त्यांनी सर्व ताकदीने प्रयत्न करावेत असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-आईच्या-मातृत्वा/

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्य महाअधिवेशन येत्या 28 मे रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. शिर्डी येथील शिर्डी राहता रोडवरील कांदा मार्केट समोरील मैदानावर हे अधिवेशन पार पडणार आहे. रिपाइंच्या या महाअधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्थानिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर नेते लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्याचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दलित, आदिवासी झोपडपट्टीवासी, मराठा, शेतकरी, कामगार आदी सर्व वर्गांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांचे ठराव मंजुर करण्यात येणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या या राज्यव्यापी महाअधिवेशनात महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ठाणे प्रदेश या भागातून हजारोंच्या संख्येने रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या महामेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.

महाअधिवेशनात मंजूर करण्यात येणारे ठराव

1- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने अनुसूचित जाती जमाती च्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा

2.- दलित आदिवासी गरीब भूमिहीनांना 5 एकर जमीन देण्याचा कार्यक्रम शासनाने राज्यात राबवावा

3- दलित मागासवर्गीयांना महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ आणि सर्व मागासवर्गीय  आर्थिक महामंडळाकडून प्रत्येकाला बिनव्याजी 10 लाख रुपयांचे कर्ज द्यावे ज्यामुळे त्यांना आपला उद्योग धंदा स्वयंरोजगार उभारता येईल.

4- मराठा समाजाला राज्य सरकार ने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र अद्याप सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अद्याप आरक्षण मिळाले नाही आमचा मराठा समाजातील  आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.

5.-ओबीसी आणि सर्व जाती समूहांची जातीनिहाय जनगणना व्हावी

6.- भटक्या विमुक्तांसाठी ओबीसी मध्ये वर्गवारी करून भटक्या विमुक्तांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे.

7.- गायरान जमिनीचा शासन निर्णय 14 एप्रिल 1990 चा आहे. त्यातील 1990च्या  मुदत मर्यादेत वाढ करून 14 एप्रिल 2010 पर्यंत चे गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करावे .

8 – 2019 पर्यंत च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता द्यावी . तसेच राज्यातील सर्व महापालिकांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना एस आर ए लागू करावी

9- खाजगी उद्योगधंद्यांमध्ये एस सी एस टी आणि ओबीसी ला आरक्षण देण्यात यावे. सरकारी नोकरी लवकर उपलब्ध होत असल्याने खासगी मोठ्या उद्योगांत नोकरीतील एस सी एसटी ओबीसीना आरक्षण देण्यात यावे.

10- सफाई कामगार अनेक वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करतात मात्र त्याचा  त्यांना काही लाभ होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जे  नित्याचे आहे ते काम कंत्राटी तत्वावर करू नये त्यात कायमस्वरूपी कामगार असावेत. त्यामुळे सफाईकाम नित्याचेच असल्याने सफाईकामातील कंत्राटी पद्धत बंद करून कायमस्वरूपी सफाईकामगार नेमावेत. सफाई कामगारांना अनेक वर्षे कंत्राटी ठेवण्यात  येते त्यात बदल करून त्यांना कायम करावे. ज्या कंत्राटी सफाईकामगारांना सध्या 5 वर्षे झाली आहेत त्यांना तातडीने कायमस्वरूपी तत्वावर सफाई कामगार पदाची नोकरी देण्यात यावी.

11- शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे  झालेले नुकसान एकर खर्चच्या दुप्पट दराने देण्यात यावे.

12 – सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here