Maharashtra: एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन व वापरास परवानगी : सचिव प्रविण दराडे

2
218
एकल वापर स्ट्रॉ, ताट, कप, प्लेट्स, काटे, चमचे यांच्या उत्पादन व वापरास परवानगी : सचिव प्रविण दराडे

मुंबई- प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-वेंगुर्ला-शहर-सौंदर्यी/

सचिव दराडे म्हणाले की, प्लास्टिक आणि थर्माकोल उत्पादन बंदीबाबत पर्यावरण विभागाच्या शक्तीप्रदत्त समितीची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थांपासून बनविलेल्या एकल वस्तूंना वापराची अनुमती देण्यात आलेली आहे. मात्र, सदरहू वस्तु कंपोस्टेबल पदार्थांपासून बनविलेल्या असल्याबाबत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी (CIPET) तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहणार आहे.

राज्यातील उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळावी आणि प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध असल्यामुळे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामध्ये सुसंगती राहण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला असेही दराडे म्हणाले.

2 COMMENTS

  1. […] यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम.के.गावडे, नवनिर्वाचित संचालक ज्ञानेश्वर केळजी, कर्मचारी वैभवी तळकर, विकास कुबल, प्रदीप राणे, हेमंत नाईक, शेतकरी मनोहर कुबल, बाळा कुबल, मंदार वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. तालुक्यात एकूण ४२१ शेतक-यांनी नोंदणी केली असून भात खरेदी पूर्वी दिवस निश्चित करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे.http://sindhudurgsamachar.in/maharashtra-एकल-वापर-स्ट्रॉ-ताट-कप… […]

  2. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय १९ वर्षाआतील जलतरण व ड्रायव्हिंग या स्पर्धेत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या कुणाल संदिप पेडणेकर याने यश संपादन केले आहे. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-एकल-वापर-स्ट्रॉ-ताट-कप… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here