🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई –
महाविकास आघाडी गेली अडीच वर्षे रडत बसली होती. केवळ आम्हाला शिव्याशाप देण्यातच त्यांनी अडीच वर्षे वाया घालवली. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसली तरी आम्ही रडत न बसता विकासकामे करत होतो आणि यापुढेही करत राहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपले रडगाणे थांबवून राज्याच्या विकासाचे गाणे गा, राज्याच्या विकासात सहभागी व्हा, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधान परिषदेत जोरदार फटकेबाजी केली. अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली असून आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी सभागृहात दिली.https://sindhudurgsamachar.in/kokan-शिरोडा-वेळागर-सुरूच्या-ब/
आम्ही अडीच वर्षांत अनेक योजना राबवल्या, अनेक विकासकामे केली. त्यामुळे हे गुलाबी वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. मी आणि आमचे सर्व सहकारी रडणारे नव्हे तर लढणारे आहेत, असे विरोधकांना ठणकावतानाच निवडणुकीदरम्यान टोकाची टीका करताना, एकतर तू राहशील किंवा मी राहीन…असे म्हणणारे मुख्यमंत्र्यांना येऊन पुष्पगुच्छ भेट देतात, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत 2 कोटी 34 लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते दिले असून यापुढेही ते मिळत राहणार आहेत. यंदाच्या पुरवणी मागणीमध्ये 1400 कोटींची तरतूदही केली असून एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली असून 89 लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलिंडर मोफत दिले जात आहेत. ‘मुख्यमंत्री लेक लाडकी’ योजनेत 34 हजार जणांना लाभ दिला असून साडेतीन लाखांपेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.