मुंबई– एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंग्ज अँड फॅक्टरीज (बी अँड एफ) फास्ट व्यवसायाला प्रतिष्ठित आणि नामांकित तसेच भारतातील सर्वात मोठ्या मिक्स्ड युज डेव्हलपर्स आणि ऑपरेटर्सपैकी एक असलेल्या डेव्हलपरकडून परत कंत्राट मिळाले आहे. या कंत्राटाअंतर्गत हैद्राबाद येथे व्यावसायिक कार्यालयांसाठी जागेचा समावेश असलेले दोन टॉवर्स उभारले जाणार असून त्यांचा बिल्ट अप एरिया अनुक्रमे २८.९१ लाख चौरस फुट आणि २८.५३ लाख चौरस फुट असेल.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शासन-आदेश-धुडकावत-पीक-कर/
या प्रकल्पाच्या कामाअंतर्गत एमईपीसह कंपोझिट बांधकाम, फिनिशेस आणि दर्शनी भागासह 6B+G+22 मजले आणि 6B+G+41 मजल्यांचे टॉवर बांधले जाणार आहेत. हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
‘बी अँड एफ फास्ट हा खास विभाग असून त्याद्वारे अतीजलद गतीने बांधकाम पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जातो,’ असे एल अँड टीचे संपूर्ण वेळ संचालक आणि वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष (बिल्डींग्ज) श्री. एम. व्ही. सतीश म्हणाले. ‘परत मिळालेले कंत्राट हे डेव्हलपर आणि आमच्या कंपनीतील दीर्घकालीन नात्याचे तसेच या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात स्मार्ट आणि वेगवान बांधकाम करण्याच्या आमच्या क्षमतेचे निदर्शक आहे.’
बी अँड एफ फास्ट युनिटने नुकतीच डीआरडीओसाठी केवळ ४५ दिवसांत सात मजली, अत्याधुनिक फ्लाइट कंट्रोल सिस्टीम इंटिग्रेशन सेंटर बांधले आहे.
पार्श्वभूमी:
लार्सन अँड टुब्रो ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी जगभरातील ५० देशांत कार्यरत आहे. दमदार, ग्राहक केंद्रीत दृष्टीकोन आणि उच्च दर्जाचा सातत्यपूर्ण ध्यास यांमुळे एल अँड टी गेल्या आठ दशकांपासून प्रमुख व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान टिकवून आहे.
प्रकल्प वर्गवारी
वर्गवारी | सिग्नीफिकंट | लार्ज | मेजर | मेगा |
मूल्य कोटी रुपयांत | 1,000 ते 2,500 | 2,500 ते 5,000 | 5,000 ते 7,000 | >7,000 |