एसटी प्रशासनाने पारदर्शक व्यवस्थापन केल्यास ऊर्जितावस्था
कणकवली I भाई चव्हाण
कणकवली:-दि. ३– कोरोनासह एसटी कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर संपामुळे एसटीचे चाक चिखलात रुतले आहे. एसटी प्रशासनाने त्यातून मार्ग काढण्यासाठी शेजारच्या कर्नाटकासह अन्य राज्यातील सुरळीत चाललेल्या परिवहन महामंडळांच्या कारभाराचा अभ्यास करावा. एसटीच्या प्रशासकीय अधिकार्यांनी प्रत्येक व्यवहारात टक्केवारीचा मोह टाळून अतिरिक्त कर्मचार्यांच्या माध्यमातून कुरिअर, मालवाहतूक आदी बाबींकडे लक्ष देऊन पारदर्शकपणे व्यवस्थापन केल्यास एसटीला पुर्वी प्रमाणे ऊर्जितावस्था नक्कीच येईल, असा विश्वास कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी मुंबई येथे केले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ले-हापूस-ची-मार्/
एसटीची घटत चाललेली प्रवासी संख्या आणि त्यावर उपाययोजना या विषयावर कोविआच्या दादर येथील कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी केळुसकर बोलत होते. यावेळी कोविआचे सरचिटणीस एकनाथ दळवी, उपाध्यक्ष प्रकाश तावडे, रमाकांत जाधव, मनोहर डोंगरे, चंद्रकांत आम्रे, सूर्यकांत पावसकर आदी उपस्थित होते.
एसटीच्या सार्वजनिक प्रवासी वाहतूकीमुळेच विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, शेतकरी आपला माल शहरात नेऊ शकत आहे, नागरिकांना सरकारी कामे करून घेता येत आहे, वैद्यकीय सेवा घेता येत आहे,भाविकांना देव दर्शनासाठी, जत्रोत्सवाला जाता येत आहे, सामान्य पर्यटकांना फिरण्याची हौस भागवता येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कारभारात आम्रुलाग बदल होण्याची गरज आहे, असे स्पष्ट करून केळुसकर म्हणाले, गेल्या काही वर्षांत जागतिकीकरणामुळे प्रवाशांनी दूचाकी, चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली आहे. खाजगी प्रवासी गाड्यांना टप्पा पद्धतीने प्रवासी सेवा करता येत नाही. मात्र राजकारण्यांच्या कृपाशीर्वादाने ही वाहतूक राजरोसपणे चालू आहे. त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या एक तृतीयांश एवढी घटल्याने त्याचा फटका महामंडळाला बसत आहे. पण शेजारील राज्यांतील सुरळीत चालू असलेल्या एसटी महामंडळाच्या कारभाराचा अभ्यास करून उपाय योजना आखल्यास आपल्या एसटीचा कारभार मुळ स्थितीत येऊ शकेल.
सद्या एसटीकडे अतिरिक्त कर्मचारी वर्ग बराच आहे. या कर्मचार्यांच्या सहकार्याने खाजगीरित्या चालणारी कुरिअर, मालवाहतूक सेवा एसटीने अंगिकारायला हवी, अशी सूचना करून ते म्हणाले, एसटीची प्रवासी संख्या घटल्याने स्थानकांतील व्यवसायीकांचे फार मोठे नुकसान होत आहे. भाडी परवडत नसल्याने शेकडो व्यावसायिकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना आणि संप काळातील त्यांच्या भाडे माफीचा निर्णय अद्याप न झाल्याने ते कर्ज बाजारी झाले आहेत. तरी त्यांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सुमारे ३५ हजारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरही तोडगा काढायला हवा.