🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l नाशिक –
गेल्या काही महिन्यांपासून मद्यधुंद चालकाच्या बेपर्वाही मुळे झालेल्या बस अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.यामुळे कित्येक प्रवाशांना हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे.याच पार्शवभूमीवर आता एसटी महामंडळाने गुटखा, तंबाखू प्रेमींसह तळीराम कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याबाबत आगार प्रमुखांकडून याबाबत माहिती मागविली जात आहे.प्रवासासाठी नागरिक विश्वासाने एसटीला पसंती देतात. दररोज लाखो नागरिक एसटीने प्रवास करतात. प्रवाशांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची हमी घेत प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्यासह महामंडळ अनेक वर्षे सेवा पुरवित आहे; परंतु मद्यपान व तत्सम व्यसनांच्या आहारी गेलेल्या काही मोजक्या चालक वाहकांमुळे महामंडळाची प्रतिमा खराब होत आहे. ही बाब टाळण्यासाठी महामंडळाने पाउले उचलली आहेत.https://sindhudurgsamachar.in/kokan-पोंभुर्ले-येथे-32-व्या-राज/
थेट कठोर कारवाई केली जाणार
व्यसनांच्या आहारी गेलेल्या चालक, वाहकांचा अहवाल राज्य परिवहन विभागाच्या मुख्य कार्यालयाकडून मागविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.आगारप्रमुखांना याबाबत आदेश देण्यात आले असून, जिल्ह्यातील लहान मोठ्या आगारांकडूनही ही माहिती गोळा केली जात आहे. स्थानिक पातळीवर कारवाई करूनही कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीत बदल होत नसल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. गुटखा, तंबाखूसह मद्यपान करून कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराच महामंडळाने दिला असून, आगारप्रमुखांनी पाठविलेल्या अहवालानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यावर वरिष्ठ पातळीवरून लक्ष ठेवण्यात येवून थेट कठोर कारवाई केली जाणार आहे