🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l पुणे –
पुण्यातील एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणी पुणे पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केली आहे. अन्वित सुधीर फाटक असे या संस्थाचालकाचे नाव आहे. कर्वेनगरमधील एका नामांकित शाळेतील नृत्यशिक्षकाने लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करत त्याचे मोबाईलमध्ये रेकॉडिंग करुन ते इतर लोकांना पाठविण्याची धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यापासून पासून १४ डिसेंबर पर्यंत सुरु होता. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एकाही-पात्र-बहिणीच्या-ख/
पुण्यातील कर्वेनगर भागात असलेल्या एका नामांकित शाळेत 39 वर्षे आरोपी हा डान्स शिक्षक म्हणून नोकरी करत होता. 2022 मध्ये या शाळेने त्याला कंत्राटी पद्धतीने कामावर ठेवलं होतं. शाळेत रुजू झाल्यापासून हा शिक्षक सहावी शिकणाऱ्या एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. दोन दिवसांपूर्वी या शाळेत विद्यार्थ्यांचं समुपदेशन सुरू होतं. त्यादरम्यान विद्यार्थ्याने आपल्याबरोबर घडलेला प्रकार समुपदेशकाला सांगितला. त्यानंतर तात्काळ समुपदेशक आणि पोलिसांत धाव घेतली. घडलेला प्रकार संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि शाळेला देखील कळवला. 2022 ते 2024 या दोन वर्षांमध्ये एकूण चार मुलांवर त्याने अत्याचार केल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात स्पष्ट झालं आहे.
पुण्यातल्या या शाळेत सहावीच्या वर्गात समुपदेशक ‘गुड टच, बॅड टच’ बाबत विद्यार्थ्यांशी बोलत होते. यातच खेळ आणि चर्चा सुरु असताना लैंगिक अत्याचार म्हणजे काय याबाबत एका 11 वर्षांच्या विद्यार्थ्याने विचारणा केली. त्याला याबाबत माहिती दिल्यानंतर असा प्रकार आपल्यासोबतही झाल्याचं त्याने सांगितलं. शाळेत शिकवणाऱ्या डान्स टिचरने आपल्याला ‘बॅड टच’ केल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर या समुपदेशकांनी तातडीने शाळा प्रशासनाला याबाबत माहिती दिली. शाळेने पालकांशी चर्चा करत पोलिसांकडे याप्रकरणाची तक्रार दाखल केली. यानंतर या शिक्षकाला अटक करण्यात आली.
या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आणखी एका दहा वर्षाच्या मुलाबरोबर असाच प्रकार घडल्याचं समोर आलं. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल केला. संबंधित शाळेने या शिक्षकाला निलंबित केलं असून या सगळ्यात शाळा प्रशासन पोलिसांना सहकार्य करेल असं सांगितलं आहे.
दरम्यान आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून त्याने याआधी किंवा शाळेतील इतर आणखी मुलांबरोबर असं काही कृत्य केलं आहे याचा तपास सुरू आहे. तर पोलिसांकडून शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
शिक्षणाच्या माहेर घरात घडलेल्या या घटनेनंतर अनेक पालक चिंतेत आहेत. आपली मुलं शाळेत सुरक्षित नसल्याने पालक तणावात आहेत. या शाळेतील पालकांनी शाळा प्रशासनाची भेट घेत आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शाळेतील सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शिक्षकांची चारित्र्य पडताळणी व्हावी अशा मागण्या केल्या आहेत.