मुंबई: जनवादी लेखक संघ या पुरोगामी लेखक, संघटनेचे राज्य संमेलन, रविवार दि. ३० एप्रिल रोजी, कल्याण येथील के एम अग्रवाल, महाविद्यालयात भरणार आहे.
संमेलनाचे उदघाटन सकाळी १०.३० वाजता, हिंदीतील सुप्रसिद्ध कवी नरेश सक्सेना करतील, उर्दूतील प्रसिद्ध व्यंगावर फय्याज अहमद फैजी, सुप्रसिद्ध हिंदी कथाकार नमिता सिंह, मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन डांगळे, कादंबरीकार व समीक्षक जी के ऐनापुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून संमेलनात उपस्थित राहणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-बागलाची-राई-येथे-आरती-प्
या संमेलनात दुपारच्या सत्रात, वैचारिक परिसंवाद, कवी संमेलन, मुशायरा व स्थलांतरितांच्या समस्येवरील सुप्रसिद्ध कादंबरीकार जॉन स्टेन बेकच्या कादंबरी वरील रूपांतरित, विजय कुमार दिग्दर्शित हिंदी नाटकाचा प्रयोग ही संध्याकाळी संमेलनातहोणार आहे. संमेलनात नवी कार्यकारिणीही निवडली जाणार आहे.
या संमेलनात हिंदी, उर्दू, मराठीतील अनेक लेखक, साहित्यिक उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे आयोजक शैलेश सिंग, मुख्तार खान, संजय भिसे व सुबोध मोरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपर्क: मुख्तार खान 9867210054, सुबोध मोरे: 9819996029