Maharashtra: कांद्याला 4 हजार रुपयांचा भाव द्यावा ; कांदा वादात शरद पवारांची उडी

0
117
कांद्याला 4 हजार रुपयांचा भाव द्यावा ; कांदा वादात शरद पवारांची उडी
कांद्याला 4 हजार रुपयांचा भाव द्यावा ; कांदा वादात शरद पवारांची उडी

मुंबई : केंद्र सरकारने कांद्याला 4 हजार रुपयांचा भाव द्यावा, 2410 रुपयांचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. कांद्यावरील निर्यातशुल्क कमी करण्याची मागणीही शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार म्हणाले की, निर्यात शुल्कावर केंद्र सरकारने 40% कर लादल्याने नाशिकच्या सर्व बाजारसमित्यांमध्ये कांदा खरेदी बंद आहे. खरेदी बंद असल्यामुळे कांदा तीनशे रुपयांनी घसरलाय. कांद्याचा भाव 2000 ते 2400 च्या दरम्यान आला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-गणपती-स्पेशल-मेमू-दादर-रत/

केंद्र सरकारच्या निर्यायावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील सर्वच मंत्री कामाला लागले आहेत. एकिकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीवर गेले आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपान दौऱ्यावर असतानाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकार महाराष्ट्रातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच त्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे दोन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. केंद्र सरकार 2410 प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here