Maharashtra: केंद्रियराज्यमंत्री पँथर रामदास आठवले यांचे पँथर प्रेम ;सलग पाचव्या वर्षी आठवलेंनी घेतला बिबळ्या वाघ ( पँथर) दत्तक

0
64
बिबळ्या वाघ ,पँथर,
Maharashtra: केंद्रियराज्यमंत्री पँथर रामदास आठवले यांचे पँथर प्रेम ;सलग पाचव्या वर्षी आठवलेंनी घेतला बिबळ्या वाघ ( पँथर) दत्तक

मुंबई- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबळ्या वाघ (पँथर) दत्तक घेतला. वन्य प्राणी दत्तक योजने अंतर्गत सलग पाचव्या  वर्षी आज ना. रामदास आठवले यांनी त्यांचे सुपुत्र जित आठवले यांच्या हस्ते 1 लाख 20 हजार रुपये वार्षिक शुल्क अदा करून पँथर दत्तक घेतला. दलित पँथर पासून पँथर ही ओळख असणारे नेते रामदास आठवले यांचे पँथर या वन्यजीवावर प्रेम आहे. ते स्वतः दलित पँथर चे पँथर असल्याने पँथर वर त्यांचे विशेष प्रेम आहे.त्यामुळे त्यांनी वन्यप्राणी दत्तक योजनेत सलग पाचव्या वर्षी पँथर बिबळ्या वाघ दत्तक घेतला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-बाजार-समित्यांमधील-निक/

बिबळ्या वाघ पँथर चे निसर्गातील अन्न सखळी

मध्ये समतोल राखण्यात पँथर बिबळ्या वाघ महत्वाची भूमिका पार पाडतो. तसेच वन्य प्राण्यांवर प्रेम करा; निसर्गावर प्रेम करा; पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्न करा आणि वन संवर्धनासाठी निसर्गाचे आपण काही देणे लागतो या विचारातून आपण  पँथर दत्तक घेतला असुन ज्यांना शक्य आहे त्यांनी वन्यप्राणी दत्तक योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले उपस्थित होत्या.

वनसंरक्षक आणि संचालक  एस मल्लिकार्जुन यांच्या हस्ते बिबळ्या वाघ दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र ना.रामदास आठवले यांना सुपूर्द करण्यात आले. या दत्तक बिबळ्या वाघाचे नाव सिम्बा ठेवण्यात आले असून त्याचा पाचवा  वाढदिवस आज केक कापुन आणि बुद्ध वंदना घेऊन साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here