पुणे, मे १७, २०२३: सीएनएच इंडस्ट्रीयलचा ब्रॅंड आणि कृषी उपकरणांमध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या केस आयएच (CASE IH) च्या महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील त्यांच्या अत्याधुनिक उत्पादक कारखान्यातून १००० वा ऊसतोडणी यंत्राच्या उत्पादनाचा टप्पा गाठला. सीएनएच इंडस्ट्रीयलच्या नेतृत्व संघाच्या उपस्थितीत कारखान्यातून १००० वे युनिट म्हणून ऑस्टॉफ्ट ऊस तोडणी यंत्र तयार करून बाहेर आणले.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-फास्ट-एक्सच्या-म/

या प्रसंगी सीएनएच इंडस्ट्रीयलच्या भारत आणि सार्कच्या कृषी व्यवसायाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नरींदर मित्तल म्हणाले, “१००० व्या ऑस्टॉफ्ट ऊस तोडणी यंत्र तयार करून बाजारात आणणे हा केस आयएच, भारत (CASE IH) मध्ये आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे आणि हा क्षण आम्हाला आमच्या मौल्यवान ग्राहकांसाठी अनुकूलनक्षम यंत्र वितरित करण्यासाठी आमच्या क्षमता मजबूत करायला प्रवृत्त करत आहे. साखर उद्योग, शेतकरी आणि कापणी कंत्राटदारांनी हा यांत्रिक उपाय मनापासून स्वीकारला आहे. आम्ही भारत व इतर निर्यात बाजारपेठेत कापणी यंत्राचा पुरवठा करतो. आम्ही ऊसाच्या यांत्रिक लागवडीसाठी केवळ सर्वोत्तम श्रेणीतील कापणी उपायच नाही तर शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम लागवड पद्धती, जागतिक दर्जाच्या काढणीनंतरच्या उपायांसाठी संपूर्ण समाधान मिळेल अशा गुणवत्तेच्या उपकरण व यंत्रांची संपूर्ण श्रेणी प्रदान करण्यास वचनबद्ध आहोत.”
मुळात ऊस तोडणी प्रक्रिया ही एक श्रम केंद्रित आणि वेळ खाऊ प्रक्रिया आहे मात्र केस आयएच (CASE IH) ऑस्टॉफ्ट मालिका ऊस तोडणी यंत्रांची रचना ऊस तोडणीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी केली आहे. प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज केस आयएच (CASE IH) ऑस्टॉफ्ट मालिका ऊस तोडणी यंत्र भारतातील यांत्रिक ऊस कापणीमध्ये अग्रणी आहे. वजनाने हलके व आकाराने कॉम्पॅक्ट असे हे यंत्र अंशतः ओल्या शेतात कापणी करण्यास सक्षम करते, ज्यामुळे विविध परिस्थितीत कापणी करण्याची क्षमता वाढते. ही मालिका ऊस लागवडीसाठी १.२ मीटर किंवा त्याहून अधिक अंतरांवर वाफे करून ऊस लागवड करण्यास डिझाईन केलेली आहे. गेल्या ८-१० वर्षात अनेक भारतीय साखर कारखान्यांनी त्यांच्या ऊस तोडणीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी स्वीकारली आहे.
सीएनएच इंडस्ट्रीयलच्या एग्रिकल्चर इंडियाचे सेल्स आणि डीलर डेव्हलप्मेंट लीडर श्री. संदीप गुप्ता म्हणाले, “गेल्या दशकात आम्ही देशांतर्गत आणि निर्यात बाजारांमध्ये ऑस्टॉफ्ट मालिकेची यशस्वी वाढ अनुभवली आहे, ज्यामुळे यांत्रिक कापणीसाठी शाश्वत उपायांना समर्थन मिळते. आमचे उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य स्थान कायम ठेवत आमच्या ग्राहकांसह आशिया पॅसिफिक देशांमधील यांत्रिकीकरण दरामध्ये वाढ करण्यासाठी समर्थन देणे हे आमचे ध्येय आहे.”
पुणे प्लांट हा कापणी यंत्र आणि उत्पादनांच्या पीक अवशेष व्यवस्थापन श्रेणींसाठी स्थापन केलेली ग्रीनफील्ड सुविधा आहे. केस आयएच (CASE IH) द्वारे उत्पादित ऊस तोडणी दक्षिण पूर्व आशिया, आफ्रिका आणि चीनमधील देशांमध्ये निर्यात केली जाते. केस आयएच (CASE IH) जवळ जवळ ८० वर्षांपासून यांत्रिक ऊस कापणीमध्ये जगात अग्रगण्य आहे.



[…] वेंगुर्ला प्रतिनिधी – तुळस येथील प्रसिद्ध श्रीदेव जैतिराचा वार्षिक उत्सव शुक्रवार दि. १९ मे पासून सुरु होत आहे. यानिमित्त मंदिर परिसरात खेळणी, मिठाई, शेतीपयोगी, गृहपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. तुळस गावामध्ये माहेरवाशिणींसह पै-पाहुणेही आल्याने घरोघरी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-केस-आयएच-case-ih-ने-त्यांच्या-प/ […]
[…] […]