Maharashtra: कोविडच्या भयंकर परिस्थितीत निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे समाधान – जयंत पाटील

1
189
जयंत पाटील,निळवंडे धरण,
कोविडच्या भयंकर परिस्थितीत निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे समाधान - जयंत पाटील

या कालव्याच्या पाण्यातून दुष्काळी भागातील शेतकरी शेतात मोती पिकवतील ;जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई दि. १ जून – कोविडची भयंकर परिस्थिती असतानादेखील आम्ही न थांबता निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे आज समाधान वाटत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली भावना व्यक्त केली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-गेट-वे-ऑफ-इंडिया-येथे-शिव/

नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या प्रथम चाचणीचा शुभारंभ करण्यात आला ही आनंदाची बाब आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

१९७० ते २०१९ पर्यंत या धरणाच्या कामासाठी ११०० कोटी रुपये खर्च करून केवळ ४५ टक्के काम पूर्ण झाले होते. आमच्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत जवळपास ९०० कोटींचा निधी देऊन या धरणाचे ९० टक्के काम पूर्ण केले. स्वतः जलसंपदा मंत्री म्हणून धरणाच्या कामाला ३ वेळा भेट देऊन काम जलदगतीने पूर्ण करून घेण्यासाठी  प्रयत्न केल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान पाण्याच्या मदतीने नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकरी शेतात मोती पिकवून या भागाचा कायापालट करतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here