Maharashtra: क्रिकेट खेळाचा आनंद लुटा – वेंगसरकर

0
70
ड्रीम ११ कप या ११ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेल्या जी.पी.सी.सी. (गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाचे छायाचित्र. सोबत डावीकडून मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पब्लिक प्रॉसिक्युटर दीपक ठाकरे, भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, ड्रीम स्पोर्ट्सचे नवीन फर्नांडिस आणि प्रशांत तायडे दिसत आहेत.
ड्रीम ११ कप या ११ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेल्या जी.पी.सी.सी. (गणेश पालकर क्रिकेट क्लब संघ

मुंबई, ७ फेब्रुवारी : क्रिकेट खेळताना तुम्ही या खेळाचा आनंद पुरेपूर लुटा असा सल्ला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ड्रीम ११ कप या ११ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेटस्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात छोट्या मुलांना दिला. जीवनात तुम्ही कुठलेही  क्षेत्र निवडा, ते जर तुमच्या आवडीचे क्षेत्र असेल तर त्यात तुम्ही आनंद मिळवाल आणि प्राविण्य देखील मिळवाल असे वेंगसरकर यांनी या छोट्या मुलांना सांगितले.  ड्रीम ११ वेंगसरकर अकादमीच्या ओव्हल मैदान, चर्चगेट येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या  स्पर्धेत जी.पी.सी.सी. (गणेश पालकर क्रिकेट क्लब ) संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी डॅशिंग स्पोर्ट्स क्लब संघावर ९ विकेट्सनी मात करून विजेतेपदाला गवसणी  घातली. Kokan: महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी कल्याण परिमंडळाची चमकदार कामगिरी

डॅशिंग स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र फाहद शेख (१९ धावांत ३ बळी),  अंकित म्हात्रे (८ धावांत २ बळी) आणि अली (४ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचा डाव १८.३ षटकांतच ८५ धावांत गडगडला. ख्रिस्तियानो बुटेल्हो (२१), सार्थक वसईकर  (११) आणि अद्विक देसाई  (११) यांचा अपवाद  वगळता त्यांच्या  अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली.  या आव्हानाचा पाठलाग करताना  अंकित म्हात्रे (नाबाद ४६)  आणि आरव दीक्षित (१०) यांनी २२ धावांची सलामी दिली आणि त्यानंतर अंकितने अरिश खान (नाबाद २३) याच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाचा विजय साकारला. अंतिम फेरीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अंकित म्हात्रे याचीच निवड करण्यात आली.  

विजेत्यांना भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्यासह मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पब्लिक प्रॉसिक्युटर दीपक ठाकरे, ड्रीम स्पोर्ट्सचे नवीन फर्नांडिस आणि प्रशांत तायडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. २१ षटकांच्या या स्पर्धेत १२ संघांचा सहभाग होता. त्यांची चार गटात विभागणी करून प्रत्येक संघाला साखळीत किमान दोन सामने खेळण्याची संधी  मिळाली. गटातील सर्वोत्तम संघ उपांत्य फेरी साठी पात्र ठरून त्यांच्यातून उपांत्य आणि अंतिम फेरी खेळविण्यात आली.

संक्षिप्त धावफलक :-  डॅशिंग स्पोर्ट्स क्लब – १८. षटकांत सर्वबाद ८५  (ख्रिस्तियानो बुटेल्हो  २१, फाहद शेख १९ धावांत ३ बळी, अंकित म्हात्रे ८ धावांत २ बळी, अली ४ धावांत २ बळी) पराभूत विजी.पी.सी.सी. (१२. षटकांत  बाद ८६ (अंकित म्हात्रे नाबाद ४६, आरिश खान नाबाद २३) सामनावीर – अंकित म्हात्रे .

                                                     

फोटो ओळी –  ड्रीम ११ कप या ११ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजेता ठरलेल्या जी.पी.सी.सी.(गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाचे छायाचित्र. सोबत डावीकडून  मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पब्लिक प्रॉसिक्युटर दीपक ठाकरे, भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर,  ड्रीम स्पोर्ट्सचे नवीन फर्नांडिस आणि प्रशांत तायडे  दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here