Maharashtra: खार जिमखाना खुली जलतरण स्पर्धा संपन्न

0
71
खुली जलतरण स्पर्धा संपन्न
खार जिमखाना खुली जलतरण स्पर्धा संपन्न

निमिष मुळेझारा बक्षी सर्वोत्तम जलतरणपटू

मुंबई, ८ एप्रिल :  खार जिमखानाच्या वतीने आयोजित खुल्या जलतरण स्पर्धेत खार जिमखान्याच्याच निमिष मुळे आणि झारा बक्षी या दोघांनी सर्वोत्तम जलतरणपटूंचा मान मिळविला  झारा बक्षी हिने १७ ते ३० वर्षे या वयोगटातील मुलींमध्ये ६ सुवर्णपदके पटकावली तर निमिष मुळे याने ५ सुवर्ण आणि २ रौप्यपदके पटकावली   तब्बल १५ वर्षांच्या खंडानंतर खार जिमखाना जलतरण समिती आणि  वीरधवल खाडे आणि ऋजुता खाडे यांच्या गोल्ड स्टॅंडर्ड परफॉर्मन्स या प्रायोजक कंपनीच्या वतीने खार जिमखाना येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते   दोन दिवसांच्या या स्पर्धेत मुंबईतील ३१ क्लबमधील ५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी विविध वयोगटात आपला सहभाग नोंदविला होता   ६ वर्षे या वयोगटापासून ते ६० वर्षावरील अशा विविध वयोगटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते   सर्व वयोगटातील पहिल्या तीन वेजेत्यांना मेडल्स,  ट्रॉफी, प्रमाणपत्रे यांसह रोख पारितोषिके देखील प्रदान करण्यात आली   सर्वोत्तम जलतरणपटू ठरलेल्या दोघांना प्रत्येकी १० हजाराची रोख रक्कम देण्यात आली  सदर स्पर्धेत खार जिमखाना संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-एसओआयच्या-छोट्या-संगीत/

 राष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे यांनी या वेळी बोलताना सांगितले की अशा प्रकारच्या स्पर्धा या किती मेडल्स कमावली यापेक्षा आपली स्वतःची कामगिरी किती उंचावली हे पाहण्यासाठीच असतात   यश किंवा अपयश कशी  पचवायची हे या स्पर्धा शिकवत असतात आणि याच माध्यमातून एक उत्तम माणूस म्हणून घडण्यास मदत होत असते  खार जिमखान्याच्या संयुक्त सचिव सारिका जैन यांच्या मते अशा स्पर्धा खेळाडूंना शिस्त आणि अधिक मेहनत करण्याची शिकवण देणाऱ्या असतात,  स्पर्धेचे निकाल यासमोर दुय्यम असतात 

विविध वयोगटातील विजेते आणि उपविजेते :

मुले ६ वर्षाखालील : कियान पालांडे (पोलीस स्विमिन्ग पूल) – २ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य

                  अगस्त्य राव (एस वी पी स्विमिन्ग पूल) १ सुवर्ण, २ रौप्य, १ कांस्य

मुली ६वर्षाखालील : शौर्या खरुडे (मुलुंड स्विमिंग पूल) २ सुवर्ण,१ रौप्य

                 गिरीजा पांडे (छत्रपती शिवाजी एम एस एस) – १ सुवर्ण, २ रौप्य

मुले ८ वर्षाखालील : क्रिशीव नागपाल (खार जिमखाना) – ३ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य

                 कबीर टेकचंदानी (खार जिमखाना) – २ सुवर्ण १ रौप्य

मुली ८ वर्षाखालील: देविका खरुडे (मुलुंड स्विमिंग पूल)- ४ सुवर्ण, १ रौप्य                

                                 रस्या कोपीकर (फॉरेस्ट क्लब) – ३ रौप्य, १ कांस्य

मुले १० वर्षाखालील: अहण दवे (महात्मा गांधी स्विमिंग पूल)- ३ सुवर्ण

                 एव्हरम रंधवा (खार जिमखाना) – ३ रौप्य, १ कांस्य

मुली १० वर्षाखालील: मायरा देशपांडे (खार जिमखाना) – ४ सुवर्ण

                  साक्षी वेमल (गोरेगाव स्पो क्लब) – १ रौप्य, ३ कांस्य

मुले १२ वर्षाखालील: कबीर खुबचंदानी(खार जिमखाना) – ५ सुवर्ण

                 समर्थ विक्रम (ऑटर्स क्लब) – ४ रौप्य, १ कांस्य

मुली १२ वर्षाखालील: निष्ठा शेट्टी (फॉरेस्ट क्लब) – ५ सुवर्ण

                  तानिशी मुझुमदार (खार जिमखाना) – २ रौप्य, ३ कांस्य

मुले १४ वर्षाखालील:  फतेह चहल (फॉरेस्ट क्लब) – ५ सुवर्ण

                  अर्चित परब (छत्रपती शिवाजी एम एस एस) – ४ रौप्य, १ कांस्य

मुली १४ वर्षाखालील:  सानवी देशवाल (ऑटर्स क्लब) – ५ सुवर्ण, १ रौप्य

                   अन्वी देशवाल  (ऑटर्स क्लब) – १ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य

मुले १६ वर्षाखालील :  अर्चित मोरवेकर (महात्मा गांधी स्विमिंग पूल)- ३ सुवर्ण, २ रौप्य

                   ओम साटम (पोलीस स्विमिंग पूल) – २ सुवर्ण, ३ रौप्य

मुली १६ वर्षाखालील :  सनया शेट्टी (खार जिमखाना) – ३ सुवर्ण, १ रौप्य, २ कांस्य

                    रुचिका शेट्टी (महात्मा गांधी स्विमिंग पूल) – ३ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य

पुरुष १७ ते ३० वयोगट : निमेश मुळे (खार जिमखाना) – ५ सुवर्ण, २ रौप्य

                     निधीश म्हापसेकर (खार जिमखाना) – ४ रौप्य

महिला १७ ते ३० वयोगट: झारा बक्षी (खार जिमखाना) – ६ सुवर्ण

                      राभ्या सिंग (ऑटर्स क्लब) – ४ रौप्य

फोटो ओळी –  खार जिमखाना आयोजित खुल्या जलतरण स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकावणाऱ्या खार जिमखाना संघाचे खेळाडू – कबीर खुबचंदानी, सनया शेट्टी, अर्चित मोरवेकर, फतेह चहल, सानवी देशवाल, झारा बक्षी, निमिष मुळे यांच्यासह खार जिमखानाच्या संयुक्त सचिव सारिका दीपेन जैन आणि प्रशिक्षक व स्पर्धेचे ऑफिशीअल्स दिसत आहेत 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here