महावितरणचे संचालक श्री. अरविंद भादिकर यांचे प्रतिपादन
विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
पुणे, दि. २९ मे २०२४: ‘खेळांमुळे खेळाडूवृत्ती व संघभावना निर्माण होते व हेच गुण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही पराभवाला सामोरे जाऊन, त्यावर मात करून नवीन भरारी घेण्याची वैयक्तिक व सांघिक जिद्द निर्माण होते’, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (संचालन) श्री. अरविंद भादिकर यांनी बुधवारी (दि. २९) केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-आपल्या-मातीची-व-शाळेचे-ना/
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती व टेबल टेनिस क्रीडास्पर्धेला प्रारंभ झाला. संचालक श्री. अरविंद भादिकर यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर महापारेषणचे संचालक (प्रकल्प) श्री. अविनाश निंबाळकर, महानिर्मितीचे संचालक (मायनिंग) डॉ. धनंजय सावळकर, पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप (महापारेषण), मुख्य अभियंता सुनील पावडे (महावितरण) व अधीक्षक अभियंता श्री. संजय भागवत (महानिर्मिती), मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती), अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. जिग्नेश रे, सरचिटणीस श्री. नरेश कुमार, उपाध्यक्ष श्री. भारत पाटील, खजीनदार श्री. ललित गायकवाड यांची उपस्थिती होती.
या राष्ट्रीय स्पर्धेत गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेशातील तसेच इतर खासगी अशा १४ वीज कंपन्यांचे ३० संघ व सुमारे ३७५ खेळाडू सहभागी झाले आहेत. शुक्रवारी (दि. ३१) या स्पर्धेचा समारोप होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमात सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच श्री. रवींद्र जगदाळे व सहकाऱ्यांनी शिवकालिन मैदानी खेळ सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप तर सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी व रामगोपाल अहीर यांनी केले. श्री. संजय भागवत यांनी आभार मानले.
फोटो नेम – AIESCB Sports Inauguration 29-05-2024
फोटो नेम – बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४५ व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती व टेबल टेनिस क्रीडास्पर्धेचे संचालक श्री. अरविंद भादिकर यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन झाले. यावेळी श्री. अविनाश निंबाळकर, डॉ. धनंजय सावळकर, श्री. अंकुश नाळे, आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पवार, श्री. अनिल कोलप सुनील पावडे आदींची उपस्थिती होती.