मुंबई – शैलेश कसबे
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्था या अग्रगण्य शिक्षण संस्थेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, मराठी भाषेची गोडी असणाऱ्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम( पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन मीडिया मॅनेजमेंट – मराठी) गेल्या २५ वर्षांपासून अव्याहतपणे सुरु आहे. हा अर्धवेळ अभ्यासक्रम असून शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांत चालविला जातो. माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ पत्रकार या वर्गात मार्गदर्शन करत आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-आपातकालीन-स्थितीत-जिल्ह
पदवी नंतर शिक्षण घेणारे विद्यार्थी, अन्य ठिकाणी नोकरी करत शिकू इच्छिणारे विद्यार्थी किंवा पत्रकारितेमध्ये करिअर करू इच्छिणारे कोणत्याही शाखेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास पात्र असतील. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जात आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वेबसाईटला भेट देऊन २० जून पर्यंत प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या प्रांगणात शनिवार दिनांक २४ जून रोजी सकाळी अकरा वाजता ५० गुणांची प्रवेश परीक्षा घेतली जाणार असून त्या परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्न आणि काही लेखी प्रश्न या स्वरूपाचे असेल.त्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतील. अर्ज करण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज भरून देणे आवश्यक आहे. इच्छुकांनी कौशल्य विकासाच्या दृष्टीने आणि माध्यम क्षेत्रातील उपलब्ध अनेक व्यावसायिक संधी मिळविण्याच्या दृष्टीने या पत्रकारिता वर्गाला जरूर प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या https://enrollonline.co.in/Registration/Apply/GICED या अधिकृत संकेस्थळावर उपलब्ध असणारा अर्ज भरणे बंधकारक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : नम्रता कडू, वर्ग समन्वयक, मराठी पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन मीडिया मॅनेजमेंट ७९७७४८९०७६, namratakadu@yahoo.com