Maharashtra: गेल्या ६० वर्षांत नव्हती तेवढी अस्थिर परिस्थिती – शाहू महाराज

0
70
शाहू महाराज
गेल्या ६० वर्षांत नव्हती तेवढी अस्थिर परिस्थिती - शाहू महाराज

कोल्हापूर- उद्धव ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली होती. या जागेवरून शाहू महाराज छत्रपतींना ठरल्याप्रमाणे उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर आज शाहू महाराजांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानले. तसेच राज्यात गेल्या ६० वर्षांत जी नव्हती तशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली.
जनतेच्या आग्रहास्तव मी तुमच्यासमोर आहे. आपल्या महाराष्ट्राला, कोल्हापूरला मोठा इतिहास आहे. शिवाजी महाराज यांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा महत्वाचा आहे. आधुनिक काळात छत्रपती शाहू महाराज यांचे समतेच कार्य आपण पाहतोय. हाच विचार जनतेमध्ये आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा प्रभाव माझ्यावर आहे, तोच विचार पुढे घेऊन जाणार आहे. विकासाला गती देणे, त्याला दिशा देणे यासाठी आपला प्रयत्न आहे, असे शाहू महाराज म्हणाले.https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्गात-१-एप्रिल-पा/

याचबरोबर राजकारणात प्रत्यक्षात नव्हतो. मात्र, राजकारणाच्या सीमेवर नेहमीच होतो. आता कदाचित जनतेला वाटल असेल, आता आपण एका स्तरावर आलोय जिथे माझी आवश्यकता आहे. हीच वेळ आहे महाराजांनी यात लक्ष घालायची म्हणून जनतेच्या आग्रहास्तव उभा राहिलो आहे, असे महाराज यांनी स्पष्ट केले. काँग्रेस हा जुना पक्ष आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातील पक्ष आहे. काँग्रेसने अनेक कामे केली आहेत, काँग्रेसने ७५ वर्षे काम केले, पाया रचला. आपल्या लोकांना सरक्षण देणे, समतेचा विचार राहिला पाहिजे. विकास केला पाहिजे हाच आपला हिंदुत्ववाद आहे, असे महाराज म्हणाले.

मोदी हे १० वर्षांपासून पंतप्रधान आहेतच. त्यांच्या कार्याला कमी लेखता येणार नाही. पण समाजाला दिशा पाहिजे, ती दिशा सुधारणे अपेक्षित होते. ती सुधारेल असे दिसत नाही. कोल्हापुरातून आतापर्यंत दमदार नेतृत्व तयार झालेले नाही. भविष्यात राज्याचे राजकारण योग्य दिशेने न्यायचे असेल तर महाविकास आघाडीने नेतृत्व देणे गरजेचे आहे. एकदा राजकारणात उतरलो तर टीका होणारच, त्याकडे लक्ष द्यायचे नाही. विरोध करणाऱ्यांची मते आपण आपल्याला मिळवायची आहेत, असे शाहू महाराज छत्रपतींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here