🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई l 18 फेब्रुवारी
राज्यात अनेक ठिकाणी जीबीएसचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी वाढताना दिसत आहे. तसेच याचा वाढता प्रादुर्भाव व धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाणार आहेत. लवकरच अधिकारी आणि प्रशासनाची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर हा आजार संसर्गजन्य असल्याचे समोर आले तर त्यावर कडक उपाययोजना केल्या जातील, असेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-अर्थमंत्री-महोदय-पैसे-न/
दरम्यान, राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमच्या एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वात जास्त रूग्णसंख्या 42 रुग्ण हे 20 ते 29 वर्षे वयोगटांतील आहेत. त्या खालोखाल 50 ते 59 वर्षे वयोगटांतील मुलांचे प्रमाण 28 टक्के इतके आहे. या आकडेवारीनुसार, तरुणांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे.