Maharashtra: झेटवर्क कंपनीचे नवीन मूल्यांकन $3.1 बिलियनवर पोहोचले 

0
21
झेटवर्क कंपनीचे नवीन मूल्यांकन $3.1 बिलियनवर पोहोचले 

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l शैलेश कसबे l मुंबई-

झेटवर्कने 2024 मध्ये $90 मिलियनच्या जवळपास मोठे निधी संकलन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, ज्यामुळे कंपनीचे नवीन मूल्यांकन $3.1 बिलियनवर पोहोचले आहेही नवीन गुंतवणूक फेरी, ज्याचे नेतृत्व प्रमुख गुंतवणूकदार राकेश गंगवाल आणि विनोद खोसला यांनी केले. याशिवाय यूके स्थित बेली गिफोर्ड हे नवीन गुंतवणूकदार म्हणून झेटवर्कच्या गुंतवणूकदार यादीत सहभागी झाले. विद्यमान गुंतवणूकदार ग्रीनओक्स आणि अव्हेनीर ग्रोथ यांनीही या फेरीत सहभाग घेतला. या भांडवली गुंतवणुकीमुळे कंपनीला विशेषत: तिच्या प्राधान्य व्यवसाय क्षेत्रांमध्ये: नवीकरणीय ऊर्जा, उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक्स आणि एरोस्पेसमध्ये तिच्या वाढीच्या धोरणांना गती देण्यात मदत होईल. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-छतावर-सौर-ऊर्जा-निर्मित/

“ज्या प्रत्येक कंपनीला उत्पादन क्षमतांची आवश्यकता आहे, ती आपल्या पुरवठा साखळीला अधिक सक्षम बनविण्यावर आणि भू राजकीय धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे,”  असे खोसला व्हेंचर्सच्या श्री. जय सजनानी यांनी म्हटले.

“झेटवर्क जलदगतीने एक प्रमुख उत्पादन बाजारपेठ बनली आहे, जी ग्राहकांना जगभरातील विविध क्षेत्रांमध्ये, जसे की उद्योग, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस आणि संरक्षण यामध्ये निर्माण करण्याचे पर्याय देते. आम्ही झेटवर्कसोबत या पुढील जागतिक वाढीच्या टप्प्यात भागीदारी करण्यासाठी उत्साहित आहोत,” असेही श्री. सजनानी यांनी सांगितले.

झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंग बिझिनेस प्रा.लि. ने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी ₹17,564 कोटींचा (2.10 अब्ज डॉलर्सच्या आसपास) ग्रॉस मर्चंडाइज व्हॅल्यू (GMV) साध्य केला. कंपनीची मजबूत तत्त्वे आणि यशस्वीपणे राबविलेली बिझनेस डायव्हर्सिफिकेशन धोरण ही या यशाची कारणे आहेत.

“मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राने दीर्घकालापासून विलंब, बजेट जास्त होणे, गुणवत्तेची समस्या आणि पुरवठादारांमध्ये पारदर्शकतेच्या अभावाशी संघर्ष केला आहे. या समस्या उत्पादनाच्या वेळापत्रकावर गंभीर  परिणाम करत होत्या. आजकाल जागतिक भूराजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर, देश आपल्या पुरवठा साखळीचे विविधीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यामुळे आणखी एक नवीन आव्हान  निर्माण झाले आहे. या संपूर्ण बदलत्या वातावरणात जवळ आणि दूरच्याही जगापर्यत पोहोचण्यासाठी जागतिक ग्राहकांसाठी झेटवर्क एक महत्त्वपूर्ण भागीदार बनत आहे,” 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here