मुंबई, : ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीने अत्यंत चुरशीच्या लढतीत किंग्जले स्पोर्ट्स क्लबवर केवळ ४ धावांनी विजय मिळवून १२ वर्षाखालील मुलांच्या ड्रीम ११ कप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यावेळी झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करतानाच तुम्ही या वयातच स्वतःला चांगल्या सवयी लावल्यात आणि चांगली शिस्त लावली तर पुढील कारकिर्दीत यशस्वी वाटचाल करण्यासाठी त्याचा मोठा फायदा होईल असे सांगितले. खेळून घरी गेल्यानंतर आपले किट, बूट, पॅड्स, ग्लोव्हस,बॅट, आदी गोष्टी योग्य जागेवर ठेवण्याची सवय लावून घ्या आणि नेहमीच स्वतःचा खेळ उंचावण्यावर लक्ष्य केंद्रित करा असा सल्ला त्यांनी या छोट्या खेळाडूंना दिला. यावेळी महाराष्ट्राचे माजी वेगवान गोलंदाज मिलिंद कुलकर्णी, ड्रीम ११ चे प्रशासकीय अधिकारी नवीन फर्नांडिस आणि प्रशांत तायडे, आणि ऍडव्होकेट दीपक ठाकरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
प्रथम फलंदाजी करताना ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने निर्धारित ३० षटकांत ७ बाद १९२ धावा केल्या. विहान अस्वले (३८) आणि निखिल अहिरवाल (५९ ) यांनी ६५ धावांची सलामी दिली तर नंतर स्तवन मोरे (नाबाद ५४) आणि आकाश त्रिपाठीने देखील १९ धावांचे योगदान दिले. अद्विक देसाई याने २५ धावांत २ बळी मिळविले. या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्जले स्पोर्ट्स क्लब संघाला दर्श मातले (२६)आणि शार्दूल फटनाईक (३८) यांनी ५६ धावांची सलामी दिली तर शार्दूल आणि रीदीत पुजारी (६५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भर टाकली. रीदीतने केवळ ४२ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकत ६५ धावा केल्या. शेवटच्या चार षटकात ३४ धावांची गरज असताना रीदीतला आकाश त्रिपाठीने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करीत त्याला तंबूचा रास्ता दाखवला आणि आपल्या संघाला विजयाची आस दाखवली. शेवटच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज असताना श्लोक गवळीने (नाबाद ३३ धावा) झुंजार प्रयत्न केले पण त्यांना ३ बाद १८८ एवढीच मजल मारता आली आणि अखेर विजयासाठी चार धावा कमी पडल्या.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-रुईया-आणि-एस्सार-कुटुंब/
संक्षिप्त धावफलक – ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी – ३० षटकांत ७ बाद १९२ (विहान अस्वले ३८, निखिल अहिरवाल ५९, स्तवन मोरे नाबाद ५४, आकाश त्रिपाठी १९; अद्विक देसाई २५ धावांत २ बळी) वि.वि. किंग्जले स्पोर्ट्स क्लब – ३० षटकांत ३ बाद १८८ (दर्श मातले २६, शार्दूल फटनाईक ३८, रीदीत पुजारी ६५, श्लोक गवळी नाबाद ३३)