Maharashtra: तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा – शरद पवार

0
54
बारसूमध्ये रिफायनरी झाली तर माझी जमीन जाणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान
बारसूमध्ये रिफायनरी झाली तर माझी जमीन जाणार नाही; शरद पवारांचं मोठं विधान

मुंबई – तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. आज एमपीएससीने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-व-कुडाळ-येथे-२/

एमपीएससी परीक्षेसाठी नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत त्यांची आदरणीय शरद पवार यांनी मंगळवारी रात्री पावणे अकरा वाजता भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला होता.

एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल असा विश्वास व्यक्त करतानाच शरद पवार यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here