Maharashtra: दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल

0
21
दहावी-बारावी परीक्षा
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/ मुंबई /05 नोव्हेंबर

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत दिनांक ०५/११/२०२४ पर्यंत भरायची होती. मात्र, आता आवेदनपत्रे भरण्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, इयत्ता दहावीच्या नियमित शुल्क आवेदन पत्रात मुदतवाढ करण्यात आली. त्यानुसार, विद्यार्थी ०६ नोव्हेंबर २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान नियमित शुल्क आवेदन पत्र भरू शकतात. तर, विलंब शुल्क आवेदन पत्राची तारीख २० नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ अशी करण्यात आली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-निर्णय-अधिकाऱ्याचं-वाह/

सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी आपल्या स्कूल प्रोफाइलमध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरण्याच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिनमधून प्री-लीस्ट उपलब्ध करुन दिली जाईल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here