मुंबई: 2014 ला केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 25 विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी 23 जणांना दिलासा मिळाला आहे. तीन जणांच्या केसेस पूर्ण बंद झाल्या आहेत तर वीस जणांच्या केसेस या थंड पडल्या आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे या यादीत सर्वाधिक नेते हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रमधले या यादीत 25 पैकी तब्बल 12 नेते आहेत. 12 नेत्यापैकी 4 शिवसेना, 4 काँग्रेस, 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. https://sindhudurgsamachar.in/election-2024-कोकण-प्रादेशिक-पक्षाने/
अजित पवार याच्याविरोधात एनएसई बँकेच्या घोटाळ्यात आर्थिक गुन्हे विभागाने ऑक्टोबर 2020 मध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यानंतर शिदे सरकार आल्यानंतर या प्रकरणात पुन्हा तपास सुरू केला जाणार होता. मात्र अजित पवार शिंदे गटासोबत आल्यानंतर ईडीची या प्रकरणातील कारवाई बंद झाली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये असलेले सुवेंदू अधिकारी हे 2020 मध्ये भाजपमध्ये आले. चिटफंड घोटाळ्यात त्यांची चौकशी करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीची सीबीआय वाट पाहत आहे. परवानगी दिली तर आम्ही कारवाई करू. हेमंत बिस्वा यांच्यावर 2-14 मध्ये सीबीआय चौकशी व छापेमारीचा सपाटा सुरू होता. ज्या क्षणी ते भाजपात आले. तेव्हापासून त्यांच्याविरोधातील केस इंचभरही पुढे सरकलेली नाही.