Maharashtra: धक्कादायक! रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून‎ महिलांचे दागिने लुटले‎

0
20
रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून‎ महिलांचे दागिने लुटले
रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून‎ महिलांचे दागिने लुटले

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/ परळी‎/ 22 ऑक्टोबर

काकीनाडा पोर्ट येथून शिर्डीकडे जात‎ असलेल्या एक्सप्रेस रेल्वेला परळी – गंगाखेड ‎‎दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड करुन थांबवत ‎‎चोरांनी लूट केली आहे. ही घटना शनिवारी‎ मध्यरात्री घडली.

परळी हे नांदेड व सिकंदराबाद विभागांना ‎‎जोडणारे रेल्वे स्टेशन आहे. परळीमार्गे दररोज ‎‎किमान 25 रेल्वेगाड्या धावत असतात.‎ काकीनाडा पोर्ट ते साईनगर शिर्डी ही एक्सप्रेस‎ नेहमीप्रमाणे शनिवार रोजी रात्री 11.45 वाजता‎ परळी रेल्वे स्थानकातून सुटली. त्यानंतर‎ उखळी ते वडगाव निळा दरम्यान असलेल्या‎ आऊटर सिग्नलला बिघाड करत ही रेल्वे‎ थांबवण्यात थांबवण्यात आली. यावेळी काही जणांनी ‎रेल्वेत शिरुन आतील प्रवाशांची लूट केली.https://sindhudurgsamachar.in/ऑस्ट्रेलिया-दौऱ्यासाठी-भ/

याच दरम्यान वडगाव निळा स्टेशनवर तैनात‎ रेल्वे पोलिसांनी धाव घेताच चोरट्यांनी पलायन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केले. घटना घडली ते ठिकाण सोनपेठ पोलिस‎ ठाण्याच्या हद्दीत येत असले तरी याबाबत‎ अद्याप तक्रार दाखल करण्यासाठी कुणीही ‎आलेले नसल्याने तक्रार दाखल नसल्याचे‎ परळी रेल्वे पोलिस ठाण्याचे पीएसआय‎ सोमनाथ वाघमोडे यांनी सांगितले. दोन‎ दिवसापूर्वीच घाटनांदुर स्थानकावर प्रवाशांना‎ लुटल्याची घटना ताजी असताना ही घटना‎ घडल्याने रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here