Maharashtra: नव्या वर्षात इंडिया आघाडीच्या भात्यात नवीन पक्ष, ‘वंचित’चा समावेश पक्का झाल्याची माहिती

0
67
नव्या वर्षात इंडिया आघाडीच्या भात्यात नवीन पक्ष
व्या वर्षात इंडिया आघाडीच्या भात्यात नवीन पक्ष, 'वंचित'चा समावेश पक्का झाल्याची माहिती

मुबंई- येत्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला विरोधकांच्या इंडिया आघाडीत (I.N.D.I.A ) आणखी एका नव्या पक्षाचा समावेश होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भात इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची मान्यता असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे पुढाकार घेऊन प्रमुख नेत्यांची चर्चा केल्याची माहिती आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-ग्रंथदिडीने-बालकुमार-सा/

विरोधकांच्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घ्यावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच राष्ट्रावदीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. तसेच या संदर्भात बैठक घेऊन 28 डिसेंबरनंतर त्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर एका संयुक्त बैठकीचं आयोजन केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.इंडिया आघाडीच्या निर्णयानंतर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात इंडिया आघाडीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here