Maharashtra: निर्णय अधिकाऱ्याचं वाहन पेटवलं, तिघे ताब्यात

0
16
निर्णय अधिकाऱ्याचं वाहन पेटवलं, तिघे ताब्यात
मुलाने केला जन्मदात्या आईचा गळा आवळून खून

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/ पुणे / 05 नोव्हेंबर

निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं सरकारी वाहन पेटवून दिल्याचा प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये घडला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. विनायक सोपानराव ओव्हाळ या अंध व्यक्तीने त्याच्या काही साथीदाराच्या मदतीने चिंचवड विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांचे चारचाकी वाहन पेट्रोल टाकून पेटवून दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-मानसकोंड-येथील-26-वर्षीय-व/

अंध आणि अपंग बांधवांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने विनायक ओव्हाळ यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. योजनांचा लाभ मिळत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं वाहन पेट्रोल टाकून पेटवून देऊन त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

अनिल पवार यांच वाहन पेट्रोल टाकून पेटवल्याप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विनायक सोपानराव ओव्हाळ, नागेश गुलाबराव काळे आणि अजय सुधाकर राठोड असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचं नावे आहेत. यातील मुख्य आरोपी विनायक सोपानराव ओव्हाळ यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच वाहन तोडून आपला रोष व्यक्त केला होता. तर काल पुन्हा एकदा विनायक ओव्हाळ यांनी आपल्या दिव्यांग सहकाऱ्यांच्या मदतीने टोकाचे पाऊल उचलत गाडी पेटवली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here