Maharashtra: निवती किनारपट्टीने घेतला मोकळा श्वास

0
16
निवती किनारपट्टी, beach clean machine,
निवती किनारपट्टीने घेतला मोकळा श्वास

⭐बीच क्लीन मशीनद्वारे किनारपट्टी केली स्वच्छ

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार / म्हापण/ संदिप चव्हाण-

जिल्हा परिषदेतर्फे वेंगुर्ले तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना वापरण्यासाठी मिळालेल्या बीच क्लीन मशीनद्वारे निवती समुद्र किनारपट्टी स्वच्छ करण्यात आल्याने किनारपट्टीने मोकळा श्वास घेता आहे.निवती किनारपट्टीवर ही डॉल्फिनसाठी प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक डॉल्फिन पाहण्यासाठी येथे ये-जा करत असतात.बऱ्याच वेळेस समुद्रातील प्लास्टिक कचरा, स्थानिकांकडून तसेच येणाऱ्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात रिकाम्या प्लास्टिक पिशव्या ,बॉटल्स आईस्क्रीमचे कागद मोठ्या समुद्राच्या पाण्यात फेकले जातात. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शिंदेसेनेचे-दोन-मंत्री/

त्यामुळे समुद्रातील कचरा हा किनारपट्टीवर जमा होत असल्यानेच किनारपट्टीवर अस्वच्छता दिसून येत असते.त्यामुळे पर्यटनावर देखील याचा मोठा परिणाम दिसून येतो.परंतु सध्या वापरण्यात येत असलेल्या बीज क्लिक मशीनद्वारे किनारपट्टीवर स्वच्छ सुंदर दिसत आहे.येथे आकर्षित होणाऱ्या पर्यटकांकडून देखील समाधान व्यक्त केले जात आहे.तसेच नुकतेच मेढा निवती किनाऱ्यावर फाउंडेशन ऑफ इन्व्हरमेंट एज्युकेशनच्या ब्ल्यू फ्लॅग सर्टिफिकेशन बीजसाठी अधिकारी यांच्या कडून चाचपणी करण्यात आली असून या मानांकनासाठी सकारात्मक दाखवण्यात आली आहे. आपल्याला लाभलेल्या मेढा निवती किनारपट्टीच्या सौंदर्याचे नाव लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावे यासाठी आपल्या कार्यकाळात ग्रामपंचायत सरपंच अवधूत रेगे व त्यांची सर्व टिम मेहनत घेत आहेत.जेणे करुन स्थानिक तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होऊन पर्यटन वाढून आर्थिक दृष्ट्या विकास व्हावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here