मुंबई, १ जून : महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या वतीने दादरच्या एल. जे. ट्रैनिंग सेन्टर येथे पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेत गॉर्डन डिकॉस्टा यांना अजिंक्यपदाचा मान मिळविला. अंतिम फेरीत त्याने विजय बने याचा ९-२ असा पराभव करून ही करामत केली. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत अश्विन फेरो याने संतोष बने याला ७-२ असे नमवून तिसरा क्रमांक पटकावला. https://sindhudurgsamachar.in/kokan-राज्यशासनाचा-पुण्यश्लो/
तत्पूर्वी प्रथम साखळी आणि नंतर बाद फेरी असे आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेत गॉर्डन, विजय बने , अश्विन फेरो आणि संतोष बने यांनी आपापल्या गटात अग्रक्रमांक पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत गॉर्डन आणि संतोष बने यांच्यात लढत झाली आणि यात गॉर्डन याने ९-२ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य लढतीत विजय बने यांना अश्विन फेरो याला १७-० असे सहज हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती.
विजेत्यांना महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी तसेच सर्व सहभागी खेळाडूंना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन करण्यात महाराष्ट्र कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष अरुण केदार, संघटनेचे सचिव यतीन ठाकूर, खजिनदार अजित सावंत यांनी पुढाकार घेतला होता. स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोशिएशन मुंबईचे अध्यक्ष जी. विश्वनाथ आणि सचिव क्लेटन मुरझेलो यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल महाराष्ट्र कॅरम संघटनेचे आभार मानून यापुढेही असे उपक्रम राबवावेत अशी आशा व्यक्त केली.
[…] […]