Maharashtra: परळी भुषण पुरस्कारांचे 23 फेब्रुवारी रोजी ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण

0
38
Maharashtra: अवकाळी व गारपीठीने मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांवर आभाळ फाटलंय, सरकारने संवेदनशीलता दाखवावी - धनंजय मुंडे
Maharashtra: अवकाळी व गारपीठीने मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांवर आभाळ फाटलंय, सरकारने संवेदनशीलता दाखवावी - धनंजय मुंडे

आनंदग्रामचे दत्ताभाऊ बारगजे व सौ. संध्याताई बारगजे यांचीही उपस्थिती
परळी- प्रतिनिधी- दै.मराठवाडा साथीच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त  देण्यात येणाऱ्या परळी भुषण पुरस्कार, विशेष गौरव व विद्यार्थी वर्गासाठी आयोजित करण्यात आलेल्या बाल धमाल स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा गुरुवार दि. 23  फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शुभ हस्ते पुरस्कारांचे वितरण होत असून प्रमुख अतिथी म्हणून आनंदग्राम  प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ बारगजे, संचालिका सौ. संध्याताई बारगजे उपस्थित राहणार आहेत. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पत्रकारिता-कोश-2023-चा-प्/

आनंदग्रामचे दत्ताभाऊ बारगजे व सौ. संध्याताई बारगजे यांचीही उपस्थिती

दै.मराठवाडा साथीच्या वतीने 43 व्या वर्धापन दिनानिमित्त परळी भुषण पुरस्कार वितरण सोहळा 23 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी राजपत्रीत वर्ग-1 अधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यीक डॉ. मंजुषा कुलकर्णी, ज्येष्ठ व्यापारी तथा समाजसेवक विजय सामत, प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास रामदासी, ज्ञानबोधीनी विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे, सामाजिक कार्यकर्त्या तथा कवि सौ. दीपा बंग यांना परळी भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वैद्यनाथ विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक संजय देशमुख, ज्येष्ठ समाजसेवक भिवा बिडगर, राजस्थानी मल्टीस्टेटचे आयटी सेल प्रमुख अनंत भाग्यवंत यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

गुरुवार दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वा. वैद्यनाथ सहकारी औद्योगीक वसाहत सभागृह, नाथ रोड येथे पुरस्कार वितरण होणार आहे. याच कार्यक्रमात विद्यार्थी वर्गासाठी आयोजित करण्यात आलेल्या 7 दिवसीय बाल धमाल स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच नागरिकांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन संपादक सतिश बियाणी, बाल धमाल संयोजन समिती प्रमुख ओमप्रकाश बुरांडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here