अखेर भाजप आमदार राम सातपुतेंनी मागितली माफी
मुंबई – आदरणीय शरद पवारसाहेब यांचा सभागृहात एकेरी उल्लेख करणार्या भाजप आमदार राम सातपुते यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर अखेर राम सातपुते यांना जाहीर माफी मागावी लागली. विशेष म्हणजे भाजप आमदार आशिष शेलार यांनीही राम सातपुते यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. https://sindhudurgsamachar.in/kokan-काजू-प्रक्रिया-उद्योजका/
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम सातपुते तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळे याची आठवण करून दिली मात्र ही बाब पचनी न पडलेल्या राम सातपुतेंनी आंबेडकरांनी घटना दिली म्हणून आहे परंतु ‘तुमच्या पवाराने आरक्षण दिले नाही’ असा एकेरी उल्लेख केला. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षांना वक्तव्य तपासून सांगेपर्यंत असा नवीन पायंडा तयार करता आहात का असा सवाल यावेळी केला.
राम सातपुते यांनी माफी मागावी यासाठी राष्ट्रवादी आमदार आक्रमकच राहिले. माफी मागेपर्यंत आमदार घोषणाच देत राहिले. शेवटी विधानसभा अध्यक्षांनी राम सातपुते यांना सूचना केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.