मुंबई l विजय बने
दिलीप वेंगसरकर फौंडेशनच्या वतीने ७ एप्रिल पासून माटुंग्याच्या वीर दडकर मैदानात पहिल्या वासू परांजपे कप या १३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत एकूण ८ संघांचा सहभाग असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येकी ३५ षटकांच्या या स्पर्धेत प्रत्येक संघाला तीन-तीन साखळी सामने खेळण्याची संधी मिळणार असून गटातील सर्वोत्तम संघ ११ एप्रिलला होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.