Maharashtra: पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरणी पोलिस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित

0
32
विशाल अग्रवाल,
पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरणी पोलिस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित

पुणे- कल्याणीनगर हिट अँड रन अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी असे निलंबित करण्यात आलेल्याची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी याबाबत आदेश दिला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-लैला-खान-परिवार-हत्या-प्/

शनिवारी मध्यरात्री कल्याणी नगर आलिशान कारने दिलेल्या धडकेत अभियंता तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जमावाने कार चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला बेदम चोप देऊन या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली होती. यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी हे घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच तोडकरी यांनी या अपघाताची माहिती पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे यांना दिली होती. यानंतर जगदाळे हे सुद्धा घटनास्थळी आले होते. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शनी अल्पवयीन कार चालकाला चोप दिला होता. नियमानुसार अशा वेळी पोलिसांनी त्याला रुग्णालयात घेऊन जायला हवे होते. मात्र तेथे उपस्थित असणाऱ्या जगदाळे आणि तोडकरी हे त्याला येरवडा पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

तसेच याप्रकरणाची माहिती पोलीस कंट्रोल रूम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास द्यायला हवी होती, ती दिली नाही. तसेच नाईट राऊंडवर असलेले पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनाही अपघाताची माहिती दिली नाही. त्यांच्या या कृत्यामुळे पोलीसांच्या कार्यक्षमतेवर आणि तपासावर संशय निर्माण झाला होता. तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत न दिल्याचा ठपका ठेवत या दोघांचं निलंबन करण्यात आलं आहे.

या अपघात प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे वडील तसेच पब चालक आणि मॅनेजर यांना शुक्रवारी पुणे पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर विशाल अग्रवाल यांच्यासह पब मालक आणि मॅनेजर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. कल्याणी नगर अपघात प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर इथून पोलिसांनी अटक केली होती. तर अल्पवयीन मुलाला मद्य पुरवण्याची परवागणी दिल्याप्रकरणी प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नितेश शेवाणी आणि जयेश गावकर यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यावर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here