Maharashtra: पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांचे तात्काळ निलंबन करा – नाना पटोले

0
25
पोलिस महासंचालक रश्मी शुक्लां,
पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांचे तात्काळ निलंबन करा - नाना पटोले

मुंबई – महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, आत्महत्या, हत्या याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. बदलापूर येथील घटनेनंतर तर राज्यातील महायुती सरकार कायदा-सुव्यवस्था राखण्यात पूर्णत: अपयशी ठरले असून पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे तात्काळ निलंबन करा आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-अखेर-शक्तिपीठ-महामार्ग/

पटोले यांनी म्हटले आहे की, बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर १५ दिवस अत्याचार सुरू होते, हे उघड झाले आहे, शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही गायब आहे. बदलापूर पोलिस ठाण्यामधील महिला अधिका-यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची मुंबईत बदली करून एकप्रकारे बक्षीसच दिले आहे. ही शाळा भाजप-संघाशी संबंधित असल्याने शाळा संचालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे त्यात योगदान दिसत आहे. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here