Maharashtra: पोलीस भरती चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

0
30
पोलिस भरती
पोलीस भरती चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

मुंबई – ठाण्यात पोलीस भरतीसाठी धावताना अमळनेरच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर पोलीस भरती मैदानी चाचणीदरम्यान सहा जणांची प्रकृती खालावली आहे. त्यापैकी एका अत्यवस्थ उमेदवारावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. नवी मुंबई कॅम्पसाठी सुरू असलेल्या पोलिस भरतीदरम्यान शनिवारी झालेल्या मैदानी चाचणीत अत्यवस्थ झालेल्या सात उमेदवारांपैकी एका तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अक्षय बिहाडे या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. तर आणखी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-खासदार-आमदारांवरील-खटल/

पोलिस भरतीदरम्यान मृत झालेल्या अक्षयने राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 11, नवी मुंबई कॅम्पच्या सशस्र पोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता. शनिवारी बाळेगाव, वाकळण येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरू होती. पुरुष उमेदवारांमध्ये 5 किमी धावण्याची चाचणी सुरू असताना सात उमेदवारांना चक्कर येऊन ते खाली पडले. अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की त्याने काही सेवेन केले होते, याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

अक्षयच्या मैदानावर झालेल्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here