Maharashtra: बंसल क्लासेसच्या वतीने शिवजयंतीनिमित्त टॅलेंट सर्च परीक्षा

0
45

औरंगाबाद  (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बंसल क्लासेस तर्फे इयत्ता 4 थी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन केलेले आहे.  या परीक्षेमध्ये कोणत्याही माध्यमाचा विद्यार्थी सहभागी होऊ शकतो. बंसल क्लासेसने ही परीक्षा महाराष्ट्रात सर्वत्र राबविली आहे. जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेमध्ये महाराष्ट्रभरातून सहभागी होतील..https://sindhudurgsamachar.in/maharashtra-परळी-भुषण-पुरस्कारांचे-23/

बंसल क्लासेसच्या महाराष्ट्र राज्यात जवळपास 35 पेक्षा जास्त शाखा कार्यरत असून या सर्व शाखांच्या मार्फत टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन केलेले आहे. यामध्ये दि. 18 व 19 फेब्रुवारी 2023 रोजी गंगाखेड, केज, उद्गीर, सोलापूर, पुसद, बजाजनगर (औरंगाबाद) आणि वैजापूर आदी शाखांमार्फत ही परीक्षा संबंधीत तारखेत त्या-त्या शाखांच्या कार्यक्षेत्रात होणार आहेत.  त्याच प्रमाणे दि. 25 व 26 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद, अहमदनगर, अकोला, जालना, नाशिक, लातूर, नांदेड, परभणी, बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, पंढरपूर, गेवराई, उमरगा, पुणे, उस्मानाबाद, अहमदपूर, शिरसाळा, हिंगोली, सिन्नर, संगमनेर, नाशिक आदी शाखां मार्फत संबंधित तारखेत टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या परीक्षेच्या मार्फत इयत्ता 4 थी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांना 1.5 करोडची शैक्षणिक शिष्यवृत्ती व 31 लाख रूपयांची रोख पारीतोषिके देण्यात येणार आहेत. बंसल क्लासेस महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रवर्तक मा.श्री.चंदुलालजी बियाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन व नियोजन व्यवस्थितरित्या करण्यात आलेले आहे. यासाठी बंसल क्लासेसचे जवळपास 1500 पेक्षा जास्त कर्मचारी मेहनत घेत आहेत. टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या नजीकच्या बंसल क्लासेस शाखेत संपर्क करावा असे आवाहन बंसल क्लासेस समूहातर्फे करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अशा प्रकारची भव्य-दिव्य स्वरूपाची परीक्षा आयोजित करणारे बंसल क्लासेस खऱ्या अर्थाने शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना अर्पण करत आहे.

टॅलेंट   सर्च परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा  – चंदुलाल बियाणी
राजस्थान कोटा येथील राष्ट्रविख्यात बंसल क्लासेस आम्ही विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्यात घेऊन आलो आहोत. लहान वयोगटापासून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवावे ही आमची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी लहान वयोगटापासूनच नियोजनबद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे आणि विषयनिहाय सखोल ज्ञान मिळविले पाहिजे, त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना अडचणी येत नाहीत. शालेय बोर्ड परीक्षांसोबतच इतर महत्वाच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणे काळाची गरज असल्याचे चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here