⭐ सुप्रिया सुळेंनी सरकारला लगावला टोला
मुंबई – राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास कालपासूनच सुरुवात झाली आहे. राज्य सरकार 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कालपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-स्वातंत्र्य-दिन-2024-च्या-ह/
महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी लवकर आपल्या खात्यावरील पैसे काढून घ्यावे अन्यथा या सरकारचे काही खरं नाही ते दिलेले पैसे परत पण घेतील असे म्हटले आहे.
⭐ लाडकी बहीण योजनेवर रवी राणांनी केले होते वादग्रस्त वक्तव्य…
आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं रवी राणा म्हणाले होते.
राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंंदणी पूर्ण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सुमारे 1 कोटी 45 लाख 76 हजार महिलांनी नोंदणी केलेली आहे. आणि त्यातील एकूण 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.