Maharashtra: बारावीच्या परीक्षेच्या गणितच नाही आणखी २ विषयांचे पेपर लीक; पोलिसांची धक्कादायक माहिती

0
21
बारावी बोर्ड
बारावी बोर्डाच्या गणिताच्या पेपरफुटीच्या चौकशीद

मुबंई- बारावीच्या परीक्षेच्या पेपरफुटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. बारावीचा फक्त गणिताचाच नव्हे, तर केमिस्ट्री आणि फिजिक्सचाही पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. सध्या मुंबई गुन्हे शाखेकडून पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शेतकरी-जगला-तरच-राज्य-जग/

बारावी बोर्डाच्या गणिताच्या पेपरफुटीच्या चौकशीदरम्यान फिजिक्स आणि केमिस्ट्रीचेही पेपर फुटल्याचं समोर आलं आहे. प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी अहमदनगरच्या मातोश्री भागुबाई भांबरे कृषी व विज्ञान ज्युनियर महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.

३ मार्चला गणिताचा पेपर फुटण्याआधी २७ फेब्रुवारीला फिजिक्स आणि १ मार्चला केमिस्ट्रीचा पेपर फुटला होता. परीक्षेच्या एक तास आधी विद्यार्थ्यांना व्हॉटसपवरुन पेपर शेअर करण्यात आले होते, असे पुरावे सापडले आहेत. शिक्षकांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे, त्यातून मोबाईलच्या व्हॉटसपचा डाटा मिळवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here