Maharashtra: बी अ ट्रेलब्लेझर – येझ्दी रोडस्टर आता ट्रेल पॅकसह – मनसोक्त फिरा, मन सांगेल तिथे भटका!

0
36
येझ्दी रोडस्टर
बी अ ट्रेलब्लेझर – येझ्दी रोडस्टर आता ट्रेल पॅकसह – मनसोक्त फिरा, मन सांगेल तिथे भटका!

पुणे, 19 जुलै 2024 – देशभरातील मोटरसायकलप्रेमींना आनंद देण्यासाठी जावा येझ्दी मोटरसायकलने येझ्दी रोडस्टरवर आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. दमदार कामगिरी व आयकॉनिक स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेली येझ्दी रोडस्टर आता ट्रेलपॅकसह उपलब्ध करण्यात आली असून स्टँडर्ड अक्सेसरी असलेल्या पॅकची किंमत मर्यादित काळासाठी १६,००० ठेवण्यात आली आहे. या पॅकमुळे गाडीचे रूप आणि ती चालवण्याचा आनंद आणखी वाढणार आहे. भारतात प्रत्येक सीझन रायडिंग सीझन असतो आणि रायडर्सना खुल्या रस्त्यावर उतरण्यासाठी प्रत्येक क्षण योग्य असतो. ते आपल्या साहसी वृत्तीला साजेसं रायडिंग करत नवे मार्ग धुंडाळण्यासाठी उत्सुक असतात.https://sindhudurgsamachar.in/maharashtraस्विच-मोबिलिटीने-वितर/

१६,००० रुपये किंमत असलेला हा ट्रेलपॅक येझ्दी रोडस्टरवर कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दिला जाणार आहे. हा सर्वसमावेशक पॅक रोडस्टरची कामगिरी आणि वैविध्य यांना चालना देण्यासाठी तसेच रायडर्सना पूर्ण आत्मविश्वासासह वेगवेगळ्या भूभागावर रायडिंगसाठी सक्षम करणारा आहे. या पॅकमुळे त्यांचा प्रवास आरामदायी तसेच सुरक्षित होणार आहे. शहरी रस्त्यांवरून वाट काढणं असो, हायवेवर वेगानं पुढे जाणं असो किंवा ऑफ- रोडिंगचं साहस असो हा ट्रेल पॅक येझ्दी रोडस्टरला कोणताही रस्ता, कोणत्याही प्रवासासाठी सक्षम करणारा आहे.

या ट्रेलपॅकमध्ये पुढील घटकांचा समावेश करण्यात आला आहे –

– सॅडल बॅग्ज: लांबच्या किंवा जवळच्या प्रवासात सामान नेण्यासाठी योग्य

– रोडस्टर व्हायसर किट – प्रवास जास्त आरामदायी करण्यासाठी अतिरिक्त विंड प्रोटेक्शन

– हेडलॅम्प ग्रिल: हेडलॅम्पची मोडतोड होण्यापासून संरक्षण, ऑफ- रोड साहसासाठी आवश्यक

– पिलियन बॅकरेस्ट – लांबचा प्रवास पिलियनसाठी आरामदायी

– क्रॅश गार्ड – रायडर आणि बाइक दोन्हीसाठी सुरक्षेचा अतिरिक्त स्तर

– बाइक कव्हर – वापरात नसताना बाइक सुरक्षित राखण्यासाठी

जावा येझ्दी मोटरसायकल आपल्या ग्राहकांना मजेदार आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी आवश्यक सर्व साधने मिळवून देण्यासाठी बांधील आहे. नवी येझ्दी रोडस्टर आणि त्यासोबत मोफत ट्रेल पॅक देऊन कंपनीने आपल्या ग्राहकांना कोणत्याही साहसादरम्यान, कोणत्याही प्रदेशात असताना किंवा सफरीचा कालावधी कोणताही असला, तरी ट्रेलब्लेज करण्यासाठी आवश्यक साधने पुरवण्याचे ध्येय ठेवले आहे.

दमदार अल्फा २३३४ सीसी इंजिन बसवण्यात आलेली येझ्दी रोडस्टर सर्वोत्तम अक्सलरेशन आणि २९.४० एनएम टॉर्कसह प्रत्येक वेळेस सफाईदार राइड देणारी आहे. ६- स्पीड गियरबॉक्स आणि असिस्ट व स्लिप तंत्रज्ञान ती वापरण्यासाठी सोपी आणि लांबच्या प्रवासासाठी योग्य ठरली आहे. १९४ किलो कर्ब वेट १२.५ लीटरची इंधनाची टाकी यांसह ही गाडी रस्त्यावर स्थिर व टिकून राहाण्यासाठी योग्य बनवण्यात आली आहे. सीटची आरामदायी ७९० एमएम उंची आणि पुढच्या बाजूला बसवण्यात आलेले फुट पेग्ज यामुळे येझ्दी रोडस्टर निसर्गरम्य प्रदेशात भटकंतीसाठी आदर्श आहे.

पूर्णपणे लोडेड येझ्दी रोडस्टर ट्रेल पॅकसह २.०९ लाख रुपयांच्या आकर्षक किंमतीपासून पुढे (एक्स शोरूम) उपलब्ध आहे. ही रोडस्टर आपली आकर्षक वैशिष्ट्ये आणि स्टायलिश डिझाइन यांसह रायडिंगचा थरार नव्याने अनुभवण्याची संधी देण्यासाठी सज्ज आहे. भारतात प्रत्येक सीझन रायडिंगसाठी योग्य मानला जातो आणि ट्रेलपॅकसह येझ्दी रोडस्टर घेण्याची हीच चांगली वेळ आहे, कारण त्यामुळे रायडिंगचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. तुमच्या जवळच्या येझ्दी वितरकांना आजच भेट द्या आणि तुमच्यासोबत प्रत्येक भूभागावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज असलेल्या या लेजंडला घरी घेऊन या. मन सांगेल तिथे फिरा, मनसोक्त भटकंती करा आणि येझ्दी रोडस्टरसह ट्रेलब्लेझ करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here