Maharashtra: भाजपाबरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर येऊन रडले”, आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

1
812
भाजपाबरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर येऊन रडले”, आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
भाजपाबरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील, एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर येऊन रडले”, आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई- ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘मातोश्री’वर आले होते. मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे. संबंधित चाळीस आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीश संवाद साधत होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यात-पुन्हा-एकदा-सत्/

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं” असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या विधानानतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बंडखोरीबाबतचा आरोप-प्रत्यारोपाचा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

1 COMMENT

  1. Geat weblog here! Also your web sute so muhch upp
    very fast! Whaat web host aree yyou the
    usage of? Can I get your associate link for yyour host?
    I want myy website loaded upp as quiickly aas
    yours lol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here