जेजुरी-– विजयकुमार हरिश्चन्द्रे
भारतीय लोकदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन भारतीय केंद्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी घेतले. खंडोबा देवाचे दर्शनाबरोबरच तळीभंडारा करीत भंडाराही उधळून येळकोटही केला. https://sindhudurgsamachar.in/sinbdhudurg-सिंधुदुर्ग-जिल्ह्यात-क/
जेजुरीच्या खंडोबा देवता बद्दल मी ऐकून होते आज दर्शनाचा योग आला आणि मी धन्य झाले असे समाधान त्यांनी भाजपच्या सभेत व्यक्त केले. सर्वसामान्य जनतेने अर्थकरणाचे महत्व जाणून घेतले पाहिजे, आपल्या समस्या सम्बधित भाजपा अधिकाऱ्यांशी बोलल्या पाहिजेत असे मत त्यांनी मांडले. केंद्रीय मंत्र्यांच्या जेजुरीगड भेटीमूळे जेजुरी मंदिराच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला आर्थिक धोरण प्राप्त होईल असा विश्वास नागरिकांना वाटत आहे https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-नगरपरिषदेच्
शुक्रवारी सकाळी सीतारामन यांचे जेजुरी गडावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत मंदिर गुरव पुजारी ब्राम्हण कोळी घडशी दांगट या सेवेकऱ्यांच्या तसेच पालिका प्रशासन मार्तंड देवस्थान आणि माझी आमदार विजयबापू शिवतारे यांनी केले. खंडोबाच्या गाभाऱ्यात त्यांनी देवाला हरिद्रचूर्ण अर्पित करीत दर्शन घेतले. या प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार शिवतारे,राज्य भाजप प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे,राहुल कुल कांचन कुल सचिन पेशवे गणेश भोसले सचिन लमबाते सरपंच,अलका शिंदे संगीताराजे जाधव ऋतुजा जाधव दगडे देवस्थान विश्वस्थ डॉ राजकुमार लोडा ऍड प्रसाद शिंदे,संकपाळ निकुडे आदी मान्यवर उपस्तिथ होते.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-जिल्ह्याच्या-संपूर्ण-भ-2/

