Maharashtra: भारत पेट्रोलियमने केले बिना शुद्धीकरण कारखान्यातील ४९,००० कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल आणि क्षमता विस्तार प्रकल्पाचे अनावरण

1
156
भारत पेट्रोलियम
भारत पेट्रोलियमने केले बिना शुद्धीकरण कारखान्यातील ४९,००० कोटी रुपयांच्या पेट्रोकेमिकल आणि क्षमता विस्तार प्रकल्पाचे अनावरण

·         बिना शुद्धीकरण कारखान्यातील, डाउनस्ट्रीम पेट्रोकेमिकल प्लाण्ट्स आणि शुद्धीकरण कारखान्याचा ७.८ एमएमटीपीएपासून ११ एमएमटीपीएपर्यंतचा विस्तार यांसह, इथिलेन क्रॅकर प्रकल्पाचा भांडवली खर्च सुमारे ४९,००० कोटी रुपये आहे. भारतातील बाजारपेठांमधील पेट्रोकेमिकल्सची वाढती मागणी पूर्ण करण्याचे काम हा प्रकल्प करणार आहे. भारतातील पेट्रोकेमिकल्सबाबत भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत उद्दिष्टाशी हा विस्तार सुसंगत आहे. 

·         बिना शुद्धीकरण कारखाना व मुंबई शुद्धीकरण कारखान्यातील बंदिस्त वापरासाठी अनुक्रमे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात दोन ५० मेगावॉट क्षमतेचे पवनऊर्जा कारखाने स्थापन करणार, याचा एकूण खर्च सुमारे ९७८ कोटी रुपये (प्रत्येक प्रकल्पासाठी ४८९ कोटी रुपये) आहे.

·         महाराष्ट्रातील रसायनी येथे सुमारे २,७५३ कोटी रुपये खर्च करून, रिसीट पाइपलाइन्ससह, पेट्रोलियम ऑइल ल्युब्रिकण्ट्स आणि ल्युबल ऑइल बेस स्टॉक (एलओबीएस) स्थापन करणार.

मुंबई, मे १, २०२३ – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या भारतातील आघाडीच्या तेल व वायू कंपनीने ४९,००० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनेची घोषणा मोठ्या आनंदाने केली आहे. कंपनीचे पेट्रोकेमिकल व नूतनीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रातील कार्यक्षेत्र वाढवण्याच्या व मार्केटिंगमधील पायाभूत सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना आखली आहे. 

https://sindhudurgsamachar.in/maharashtra-बायजूजच्या-सह-संस्थ/

एथिलीन क्रॅकर प्रकल्प हा विस्तार योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. यातून अत्यावश्यक पेट्रोरसायनांच्या उत्पादनाला चालना मिळणार आहे. एथिलीन क्रॅकर (ईसी) कॉम्प्लेक्सची स्थापना, डाउनस्ट्रीम पेट्रोकेमिकल प्लाण्ट्स तसेच बिना शुद्धीकरण कारखान्यांतील संबंधित आस्थापनांच्या सध्याच्या शुद्धीकरण क्षमतेत वाढ करून ती ७.८ एमएमटीपीएवरून ११ एमएमटीपीएवर नेणे आदींचा या प्रकल्पामध्ये समावेश आहे. सुमारे ४९,००० कोटी रुपये भांडवली खर्चाचा हा उपक्रम बीपीसीएल व संपूर्ण ऊर्जाक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 

बिना शुद्धीकरण कारखान्याच्या विस्तारामुळे मध्य व उत्तर भारतातील पेट्रोलियम उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण होईल तसेच ईसी संकुलाला आवश्यक त्या कच्च्या मालाचाही पुरवठा केला जाईल. तर पेट्रोकेमिकल कारखाना पेट्रोकेमिकल उत्पादनांची वाढती देशांतर्गत मागणी पूर्ण करेल.

बीपीसीएलचे अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक श्रीजी कृष्णकुमार म्हणाले,“बीपीसीएलने बिना शुद्धीकरण कारखान्याची शुद्धीकरण क्षमता वाढवून ११ एमएमटीपीए करण्याच्या दिशेने पाऊल टाकून ४९००० कोटी रुपयांचा एथिलीन प्रकल्प सुरू करत पेट्रोकेमिकल्सच्या विश्वात झेप घेतली आहे. आमच्या पवनऊर्जेतील गुंतवणूकीला तसेच शाश्वत प्रक्रियांच्या दृष्टीने स्थापन केलेल्या नवीन युगातील पेट्रोलियम ऑइल वंगणांच्या आस्थापनांना याची जोड मिळाली आहे. भारतातील ऊर्जा व पेट्रोकेमिकल उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यात अग्रभागी राहण्याच्या आमच्या धोरणात्मक प्रयत्नातील हा महत्त्वाचा क्षण आहे.  

भारताला स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच जगभरातील स्पर्धात्मक पेट्रोकेमिकल शक्तिस्थान करण्यासाठी भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या तत्त्वाशी आम्ही आमची धोरणे निर्धाराने जोडून घेतली आहेत. 

हे भविष्यकाळ घडवणारे प्रकल्प रोजगाराच्या संधी निर्माण करतील आणि आमच्या शाश्वत ऊर्जा क्षमता अधिक बळकट करतील. त्यायोगे आपण अधिक संरक्षित व शून्य उत्सर्जन भविष्यकाळाकडे वाटचाल करू शकू.”

नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील काम वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कंपनी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात दोन ५० मेगावॉटचे पवनऊर्जा प्रकल्प स्थापन करणार आहे. त्यांचा उपयोग अनुक्रमे बिना व मुंबईतील शुद्धीकरण प्रकल्पांमधील बंदिस्त वापरासाठी होऊ शकेल. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ९७८ कोटी रुपये (प्रत्येक प्रकल्पाचा खर्च ४८९ कोटी रुपये) आहे. हे पवनऊर्जा प्रकल्प अधिक पर्यावरणपूरक कामकाजामध्ये योगदान देऊ शकतील. 

शिवाय, महाराष्ट्रातील रसायनी येथे रिसीट पाइपलाइन्स असलेल्या पेट्रोलियम ऑइल ल्युब्रिकण्ट्स (पीओएल) आणि ल्युब ऑइल बेस स्टॉक (एलओबीएस)  स्थापन करण्यासाठीही भारत पेट्रोलियम भरीव गुंतवणूक करत आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २,७५३ कोटी रुपये असून, साठवण क्षमता वाढवणे, पुरवठा साखळी सुरळीत करणे आणि अत्यावश्यक पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणाला शिस्त आणणे हे यामागील उद्दिष्ट आहे. 

बिना शुद्धीकरण कारखान्यातील विस्तार प्रकल्प व अन्य उपक्रम यांतून, राष्ट्राच्या उत्क्रांत असलेल्या ऊर्जाविषयक गरजांची पूर्तता करण्याप्रती तसेच ऊर्जा सुरक्षा व शाश्वतता ह्यांची खात्री करण्याप्रती बीपीसीएलचे समर्पण दिसून येते. या गुंतवणूकींमुळे कंपनीचे पेट्रोकेमिकल उद्योगातील स्थान तर बळकट होईलच, शिवाय कंपनी

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here