🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार मुबंई- मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 57 व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे आई, पत्नी, व मुलगी असा परिवार आहे. प्रख्यात नृत्यदिगदेर्शिका सोनिया परचुरे त्यांच्या पत्नी होत. त्यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. आज ता. १५ सकाळी ११ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-चित्रा-वाघ-पोहरादेवीचे/
अतुल परचुरे यांनी बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात केली.अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या .मराठी मालिकांमधूनही त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात त्यांना कर्करोगाने ग्रासल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरूहोते.या गंभीर आजारातून सावरून त्यांनी पुन्हा अभिनयास सुरुवात केली होती.परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिवसांपूर्वी ते रुग्णालयात दाखल झाले.आणि काळ त्यांची प्राणज्योत मालवली.