पुणे : दि. २९ जुलै तारखेनुसार महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण कै. बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म दिवस. याचेच औचित्य साधून महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री. विनीतजी कुबेर यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-पुरात-वाहून-मृत्यू-झालेल/
यावेळी शिवसृष्टीचे सेवक श्री. विलास कोळी यांनी लिहलेले इतिहासातील दुर्लक्षित राहिलेले एक महत्वाचे पान म्हणजे ‘मराठा कालखंडातील वाडे’ परंतु आता ते पान दुर्लक्षित राहणार नाही. कारण ‘वाडा’ या पुस्तकाचा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या अग्रगण्य विद्यापीठाच्या MA History च्या अभ्यासक्रमात समावेश झाल्यामुळे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने विश्वस्त श्री. विनीत कुबेर यांच्या हस्ते श्री. विलास कोळी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री. श्रीकांत देशपांडे यांनी झाकोळलेले संगीतकार यावर १०० लेख सजस्वर, मुंबई या संगीत समूहासाठी लिहल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अनिल पवार, प्रमोद साळुंखे, संपूर्ण शिवसृष्टीचा सेवक वर्ग आणि शिवसृष्टी पहाण्यास आलेले पर्यटक उपस्थित होते


